ठरले पण घडलेच नाही..! प्रकल्पातील पाण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच, बदलत्या वातावरणामुळे चिंतेच ‘ढग’

| Updated on: Nov 30, 2021 | 4:14 PM

णी होत नाही. हा प्रकार सर्वाधिक कृषी क्षेत्राशी निगडीत होतो. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान तर होतेच पण शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोच. आता यंदा प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने राखीव कोट्यातील पाणी हे शेतीसाठी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार नांदेडच्या जिल्हा नियोजन बैठकीत निर्णाय झालाही मात्र, अद्यापही प्रकल्पातील पाण्याच्या प्रतिक्षेत येथील शेतकरी आहेत.

ठरले पण घडलेच नाही..! प्रकल्पातील पाण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच, बदलत्या वातावरणामुळे चिंतेच ढग
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नांदेड : प्रशासकीय स्तरावर निर्णय होतात पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. हा प्रकार सर्वाधिक कृषी क्षेत्राशी निगडीत होतो. त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान तर होतेच पण शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोच. आता यंदा प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने राखीव कोट्यातील पाणी हे शेतीसाठी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार नांदेडच्या जिल्हा नियोजन बैठकीत निर्णाय झालाही मात्र, अद्यापही प्रकल्पातील पाण्याच्या प्रतिक्षेत येथील शेतकरी आहेत.

औरंगाबाद पाटबंधारे विभागाच्यावतीने जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे जालना, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी, मानार, लिंबोटी तसेच जिल्हाशेजारील इसापूर, येलदरी सिध्देश्वर येथील प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय झाला होता. पालपमंत्री अशोक चव्हाण यांनीच हे आदेश दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत पुर्तताच झालेली नाही.

निर्णयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्यातील मुख्य 8 प्रकल्प हे तुडूंब भरलेले आहेत. प्रकल्पातील पाणी हे शेतीसाठीही राखीव असते मात्र, दरवर्षी पिण्याच्याच पाण्याचे संकट असल्याने शेतीला पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. यंदा मात्र, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना व्हावी या उद्देशाने कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याअनुशंगाने बैठकही झाली मात्र, आठ दिवसांनंतरही त्याचे पालन न झाल्याने शेतकरी अद्यापही पाण्याच्याच प्रतिक्षेत आहेत.

ढगाळ वातावरणामुळे पिकेही धोक्यात

मध्यंतरी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बीसह सर्वच पिकांवर आणि फळबागांवर होत आहे. मराठवाड्यात अद्यापही पेरणी पूर्ण झालेली नाही. दिवाळीनंतर तापमानाचा पारा घसरल्याने पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले होते पण पुन्हा आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. शिवाय तुर आणि कापूसावरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घट होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे यंदा न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

असे करा पिकांचे व्यवस्थापन

ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या प्रहरी धुई पडत आहे. वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वावरात उभ्या असलेल्या पिकावर होत आहे. त्यामुळे अळी नाशकात फिनॅाफॅास हे किटकनाशक आहे तर प्रोफ्रेनाफॅस साफरमेथ्रीन किंवा कोरॅझिन हे प्रभावी किटकनाशक आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची किटकनाशके उपलब्ध असून वेळीच त्याची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांची उगवण ही नुकतीच झाली आहे. यावर किडीचा प्रादुर्भाव अधिक काळ राहिल्यास पिकांच्या वाढीवर आणि परिणामी उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळीच किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?

… तरच मिटेल कांद्याचा वांदा, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय आहे मागणी?

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?