द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादन घेतले जाते. शिवाय किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांना निर्यातीचीही सेवा दिली जाते. मात्र, त्या तुलनेत मध्य रेल्वेकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ही तफावत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 3:42 PM

नाशिक : द्राक्ष उत्पादनावर यंदा बदलत्या वातावरणाचा आणि अवकाळी पावसाचा परिणाम हा झालेलाच आहे. मात्र, घटत्या उत्पादनामुळे निर्यात केलेल्या द्राक्षाला अधिकचा दर मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादन घेतले जाते. शिवाय किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांना निर्यातीचीही सेवा दिली जाते. मात्र, त्या तुलनेत मध्य रेल्वेकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ही तफावत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

नाशिक जिल्ह्यातून बांग्लादेशात द्राक्षे निर्यात केली जातात. या देशात द्राक्ष पुरवण्यासाठी 20 ते 25 बोग्यांची आणि 10 टन क्षमतेची फॅनसुविधा असलेली उपलब्ध करुन द्यावी तसेच मार्च महिन्यापासून एसी रेल्वे देण्याची मागणी व्यापऱ्यांनी केली आहे.

रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक शेतकऱ्यांच्या हीताची

द्राक्ष ही ट्रकऐवजी रेल्वेने बांग्लादेशात पाठविण्यात आला तर कमी वेळेत, सुरक्षित तसेच त्याच्या दर्जावर काहीही परिणाम होणार नाही अशा पध्दतीने पुरवठा होणार आहे. 24 तासाच्या आतमध्ये माल बाजारपेठेत दाखल झाला तर किंमतही योग्य मिळते. ट्रकच्या माध्यमातून वाहतूक केल्यास बाजारपेठेत पोहचण्यास उशिर होतो. त्याचा परिणाम दरावर आणि सर्वच घटकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुशंगाने ह्या मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत.

काय झाले बैठकीत?

द्राक्ष निर्यातीच्या अनुशंगाने बागायतदार संघ व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली आहे. बांग्लादेशातील निर्यात कशी महत्वाची आहे यावर चर्चा करण्यात आली. सफेद द्राक्षाला बांग्लादेशात प्रतिकिलो 50 ते 55 रुपये तर काळ्या द्राक्षाला 60 ते 65 रुपये अशी ड्यूटी लागते. यामध्ये निम्म्याने कमी करुन सर्वच द्राक्षमालावर एकसारखी ड्यूटी लावण्याची मागणी होत आहे. बांग्लादेशात पोहचणाऱ्या रेल्वला किमान 30 ते 32 तास लागतात. त्यामुळे बाजारपेठेच्या वेळेत ही रेल्वे बांग्लादेशातील मालदा येथे पोहचवण्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

द्राक्ष बागांवर अवकाळीचे सावट

सध्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुर्वहंगामी द्राक्ष उत्पादक हे अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. मध्यंतरी द्राक्ष उत्पादन क्षेत्रातच पावसाने हजेरी लावली होती तर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

संबंधित बातम्या :

… तरच मिटेल कांद्याचा वांदा, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय आहे मागणी?

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.