AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Points Table: ऑस्ट्रेलियाचा झिंबाब्वे विरूद्धच्या पराभवानंतर सुपर 8 मधून पत्ता कट!

ICC Mens T20 World Cup 2026 Match Points Table: झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात सलग दुसरा विजय नोंदवला. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवासह दुहेरी झटका दिला आहे.

T20 World Cup 2026 Points Table: ऑस्ट्रेलियाचा झिंबाब्वे विरूद्धच्या पराभवानंतर सुपर 8 मधून पत्ता कट!
Australia vs Zimbabwe T20i World Cup 2026Image Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 13, 2026 | 4:50 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेत पहिले 6 दिवस दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत टफ फाईट दिली आहे. नेपाळ, यूएसए, नेदरलँड्स या सारख्या संघांना विजयी होता आलं नाही, मात्र त्यांनी प्रतिस्पर्धी संघांना सहजासहजी जिंकून दिलं नाहीय. त्यामुळे अपवाद वगळला तर एकही सामना एकतर्फी झाला नाही. त्यामुळे चाहत्यांना उलटफेर पाहण्याची प्रतिक्षा कायम होती. झिंबाब्वेने चाहत्यांनी ही प्रतिक्षा संपवलीय. झिंबाब्वेने तिन्ही फॉर्मेटमध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शुक्रवारी 13 फेब्रुवारीला लोळवलंय.

बी ग्रुपमधील झिंबाब्वेने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 170 रन्सचं टफ टार्गेट ठेवलं होतं. झिंबाब्वेने त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या कांगारुंना झटपट आणि ठराविक अंतराने झटके देत 19.3 ओव्हरमध्ये 146 रन्सवर रोखलं. झिंबाब्वेने अशाप्रकारे 23 धावांनी हा सामना जिंकला.

झिंबाब्वेकडून 2007 ची पुनरावृत्ती

झिंबाब्वेने या विजयासह 2007 ची पुनरावृत्ती केली. झिंबाब्वेने 2007 साली पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतही रिकी पॉन्टिंग याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता झिंबाब्वेने पुन्हा कांगारुंना पराभवाचं पाणी पाजलं.

झिंबाब्वेचा सलग दुसरा विजय

झिंबाब्वेचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. झिंबाब्वेने याआधी 9 फेब्रुवारीला ओमानवर मात केली होती. झिंबाब्वेने सलग दुसऱ्या विजयासह सुपर 8 साठी दावा मजबूत केला आहे. आता झिंबाब्वे या मोहिमेतील आपला तिसरा सामना हा 17 फेब्रुवारीला आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधीच झिंबाब्वेचं सुपर 8 चं चित्र स्पष्ट होणार आहे.

श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना निर्णायक

आता झिंबाब्वे सुपर 8 मध्ये पोहचणार की नाही? हे श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकलेत. तर ऑस्ट्रेलियाने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. त्यामुळे श्रीलंकेने सोमवारी कांगारुंना पराभूत केलं तर ते सुपर 8 मध्ये पोहचतील. तसेच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल आणि झिंबाब्वेही सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. मात्र ऑस्ट्रेलिया जिंकल्यास त्यांचेही 4 गुण होतील. अशा परिस्थितीत झिंबाब्वेला स्वत:च्या जोरावर सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी आयर्लंडवर मात करावी लागेल.

…तर भारत-झिंबाब्वे सामना होणार

तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास सुपर 8 मध्ये टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात सामना होईल. हा सामना चेपॉक स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं बी ग्रुपमधील श्रीलंका-ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे विरुद्ध आयर्लंड या सामन्यांकडे बारीक लक्ष असणार आहे.

बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबल

बी ग्रुपमधून श्रीलंका आणि झिंबाब्वे दोन्ही संघ अजिंक्य आहेत. मात्र श्रीलंकेचा नेट रनरेट हा झिंबाब्वेच्या तुलनेत चांगला आहे. त्यामुळे श्रीलंका पहिल्या आणि झिंबाब्वे दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1 विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंड आणि ओमानने दोन्ही सामने गमावले आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात