Chemical Fertilizer : खत विक्रेत्यांच्या मनमानीला ‘लगाम’, आता मोबाईवर पाहता येणार दुकानातील खतसाठा

| Updated on: Jun 04, 2022 | 6:45 AM

देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी माहिती देणारी एक वेबसाईट भारत सरकार खत मंत्रालयाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये खताचा पुरवठा स्टॉक आणि सर्वकाही माहिती दिलेली असते. कोणत्या दुकानामध्ये किती साठा? राज्यात किती खताची आवश्यकता आहे. शिवाय खरिपात कोणत्या पिकासाठी किता खाताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

Chemical Fertilizer : खत विक्रेत्यांच्या मनमानीला लगाम, आता मोबाईवर पाहता येणार दुकानातील खतसाठा
रासायनिक खत
Follow us on

मुंबई : सध्या (Kharif Season) खरिपाच्या लगबगीचे दिवस सुरु झाले आहेत. जो तो बियाणे आणि खताचे नियोजन लावण्यामध्ये दंग आहे. शेतकऱ्यांच्या याच घाईगडबडीचा फायदा हे सेवा केंद्रवाले घेतात. कधी-कधी तर (Fertilizer Shortage) खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने विक्रीही करतात. त्याच अनुशंगाने (Agricultural Department) कृषी विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. हे सर्व असले तरी या प्रक्रियेतून शेतकरी किंवा सर्वसामान्य व्यक्ती हा दूरच असतो. पण आता शेतकऱ्यांना या यंत्रणेचा एक भाग होता येणार आहे. आता तुम्ही ज्या बाजारपेठेत खताची खरेदी करणार आहात तेथील कृषी सेवा केंद्रात रोज खताचा किती साठा आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. मोबाईलवर देखील ही माहिती उपलब्ध होणार असून यामध्ये विक्रेत्यांना काही बनवाबनवी करता येणार नाही.

वेबसाईटवर नेमके काय?

देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी माहिती देणारी एक वेबसाईट भारत सरकार खत मंत्रालयाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये खताचा पुरवठा स्टॉक आणि सर्वकाही माहिती दिलेली असते. कोणत्या दुकानामध्ये किती साठा? राज्यात किती खताची आवश्यकता आहे. शिवाय खरिपात कोणत्या पिकासाठी किता खाताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

कसा पहायचा दुकानातील खताचा साठा?

खत मंत्रालयाची fert.nic.in ही एक अधिकृत वेबसाईट आहे. खताचा साठा किती हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम असं टाकावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटच्या उजवीकडे Fertilizer Dashboard असा पर्याय आहे. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. यानंतर लागलीच तुमच्यासमोर e-Urvarak नावाने एक पेड ओपन होणार आहे. या पेजवर देशात किती विक्रेते आहेत. शिवाय 1 एप्रिलपासून 29 मे पर्यंत किती खताची विक्री झाली आहे यासंबंधीची आकडेवारी दिली जाते. शिवाय याच पेजवर Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये Retailer Opening Stock As On Today यावर खताच्या दुकानात किती स्टॉक आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे. याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानचा Retailer ID असेल तर तो टाकावा लागणार किंवा त्या संबंधित Agency Name टाकावे लागणार आहे. यावर दुकानाचं नाव टाकून पाहू शकणार आहात.

जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर All हा पर्याय Select करुन Show पर्यायावर क्लिक करुन जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती साठा आहे याची माहिती मिळणार आहे. सर्वात शेवटी म्हणजे Select Retailer या पर्यायावर क्लिक करुन संबंधित दुकानाचे नाव निवडून Show असं म्हणले तर त्या दिवासातला साठा किती आहे याची माहिती मिळणार आहे.