दुष्काळात तेरावा : रासायनिक खताच्या दरात वाढ, शेतकरी चिंतेत

| Updated on: Nov 01, 2021 | 6:10 PM

शेती पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नाही. सेंद्रिय शेतीचा गाजावाजा केला जात असला शेतीच्या बांधावरची स्थिती काही वेगळीच आहे. यात यंदा खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. ही सर्व प्रतिकूल परस्थिती असताना उत्पादन खर्च वाढल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

दुष्काळात तेरावा : रासायनिक खताच्या दरात वाढ, शेतकरी चिंतेत
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई: शेती पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी (Chemical fertilizers) रासायनिक खतांशिवाय पर्याय नाही. (organic farming) सेंद्रिय शेतीचा गाजावाजा केला जात असला शेतीच्या बांधावरची स्थिती काही वेगळीच आहे. यात यंदा खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. ही सर्व प्रतिकूल परस्थिती असताना उत्पादन खर्च वाढल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात चाढ्यावर मूठ ठेवावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

खरीपातील उत्पादनात यंदा मोठी घट झालेली आहे. पावसामुळे मुख्य पीक सोयाबीन हे पाण्यातच होते तर इतर पिकांवरही पावसाचा परिणाम झालेला आहे. शिवाय या पिकांचे दरही घटले असल्याने रब्बीची पेरणी करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. यातच रासायनिक खतांचे दर वाढलेले आहेत. इफकोशी संबधित ज्या खतांचे उत्पादन होते त्याच खतांचे दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे डीएपी खताच्या पिशवीमागे 265 रुपयांची वाढ झालेली आहे.

म्हणून वाढले खताचे दर

दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर हा वाढत आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही. हे जरी खरे असले तरी दुसरीकडे ज्यापासून खत बनवले जाते त्याचेही दर वाढलेले आहेत. म्हणजे उत्पादन खर्च वाढल्यामुळेच खताचे दर वाढले असल्याचे स्पष्टीकरण इफको कंपनीनेच दिलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना महागडे खतेच घेऊन रब्बीची पेरणी करावी लागणार आहे.

ज्याची मागणी अधिक त्याच खताच्या दरात वाढ

रब्बीच्या पेरणीप्रसंगी अधिकतर शेतकरी हे डीएपी म्हणजेच 18:46 या खताचा अधिकचा वापर करतात. या खताच्या दरातच वाढ झाली आहे. गतमहिन्यापासून नविन खतांच्या दर हे लागू करण्यात आलेले आहेत. मात्र, ज्यांच्याकडे जुनासाठा आहे. त्यांनी जुन्या किंमतीमध्येच विक्री करण्याच्या सुचना कंपनीने दिल्या आहेत. त्यामुळे आता डि-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या किमतीत प्रति बॅग 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे नायट्रोजन-फॉस्फरस आणि सल्फर असलेल्या खताच्या प्रति पोती 70 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Increase in chemical fertilizer prices in farmers’ woes, impact on rabi sowing)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांचा नादच खुळा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 हजार ट्रॅक्टरची बुकींग

….तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा