AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धक्कादायक म्हणजे देशात महाराष्ट्रात तर सर्वाधिक आत्महत्या तर आहेतच पण चालू वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण अतिवृष्टी दरम्यानच्या महिन्याभरात बीड जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना ह्या कायम राहणार आहेत.

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Nov 01, 2021 | 5:33 PM
Share

लातूर : ( Impact of Heavy Rains) अतिवृष्टीनंतर पीक पाहणी, पंचनामे आणि आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रकमाही जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, असे झाल्याने या नुकसानीच्या खुना पुसल्या जातील असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. पीकांचे नुकसान पैशात भरुन निघेल पण अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीच्या नैराश्यातून जीवन (Farmer Suicides) संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा काय? नुकताच ‘एनसीआरबी’ ने एक अहवाल सादर केला असून गतवर्षी यामध्ये 18 टक्क्यांनी देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असल्याचे सांगितले आहे.

शेती सिचंनासाठी शाश्वत पाणीपुरवठा नाही किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर कोणते नियोजन नसल्याचा परिणाम काय असतो हे बीड (25 farmers commit suicide in Beed district in a month ) जिल्ह्यातील गेल्या 10 महिन्यातील शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. जानेवारी ते 30 ऑक्टोंबर दरम्यानच्या कालावधीत या जिल्ह्यातील 158 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा तर संपवली मात्र, कुटुंबियांच्या जीवनाची व्यथा होऊन बसली आहे.

धक्कादायक म्हणजे देशात महाराष्ट्रात तर सर्वाधिक आत्महत्या तर आहेतच पण चालू वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण अतिवृष्टी दरम्यानच्या महिन्याभरात बीड जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना ह्या कायम राहणार आहेत.

काय आहेत आत्महत्येची कारणे?

गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा म्हणून आहे. मात्र, यासंबंधी ना लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलत शाश्वत शेती सिंचनासाठी कोणती उपाययोजना केली आहे ना प्रशासनाने कोणते प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेती ही केवळ निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. अतिवृष्टी झाली तरी नुकसान आणि पाऊस नाही झाला तरी नुकसानच. यामुळे जिल्ह्यातील अधिकतर शेतकरी हे कर्जबाजारी झाले आहेत. शिवाय त्यात नापिकी आणि नैराश्य यामधूनच अधिकच्या आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या ह्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिकच असतात. मात्र, यंदा अतिवृष्टीने यामध्ये भर पडल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 10 महिन्यात 158 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यापैकी 101 शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत मिळाली आहे तर 57 कुटुंबे अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

घडी गेली की, पिढीचं नुकसान होतं. अगदी त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांची अवस्था झाली आहे. कारण काही क्षुल्लक कारणांवरुन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यामध्ये सन- 2019-20 मध्ये सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. 4006 शेतकऱ्यांनी नापिकी, वाढत्या कर्जाला त्रासून जीवन संपवले आहे. यामध्ये निसर्गाचीही मोठी भुमिका राहिलेली आहे. कारण महाराष्ट्रातील शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र, वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काय सांगतो एनसीआरबीचा अहवाल

काळाच्या ओघात शेती व्यवसयात प्रगती होत असली तरी वाढत्या आत्महत्या या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीआरबी च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे. यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. शेती व्यवसयासाठी सरकारी योजना, विविध बाबतींमध्ये सवलती असे असताना देखील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. एकट्या महाराष्ट्रात 4006 आत्महत्या ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे 2019 नंतर 2020 मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर आहे. (25 farmers commit suicide in beed district in a month due to heavy rains )

संबंधित बातम्या :

आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या

दिल्ली सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवले तर मंडई सरकारी कार्यालयातच, राकेश टिकैत यांनी दिली सरकारला ‘डेडलाईन’

जे 50 वर्षात घडलं नाही ते परभणी कृषी विद्यापीठाने यंदा करुन दाखवंल..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.