अर्थचक्र गतिमान होणार; पोलादपूरसह महाडचे बागायती क्षेत्र वाढणार, तालुक्यात तेरा बंधाऱ्यांना परवानगी

| Updated on: May 27, 2022 | 11:47 AM

पोलादपूरसह महाड तालुक्यात 13 बंधारे आणि तुर्भे खोडा जलसिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

अर्थचक्र गतिमान होणार; पोलादपूरसह महाडचे बागायती क्षेत्र वाढणार, तालुक्यात तेरा बंधाऱ्यांना परवानगी
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रायगड : पोलादपूरसह (Poladpur) महाड (Mahad) तालुक्यात 13 बंधारे आणि तुर्भे खोडा जलसिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी पोलादपूरमध्ये सात तर महाडमध्ये तीन गेटेंड सिमेंट काँक्रीट बंधारे (Dams) होणार आहेत. या बंधाऱ्यांच्या कामासाठी 43 कोटी 32 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या दोनही तालुक्याचा कायपालट होणार असून, पाण्याची सोय उललब्ध झाल्याने बागायतीचीचे क्षेत्र वाढणार आहे. याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. चिंचन क्षेत्र वाढावे यासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, पोलादपूरसह महाड तालुक्यात 13 बंधारे आणि तुर्भे खोडा जलसिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील सात बंधारे हे पोलादपूरमध्ये तर तीन बंधारे हे महाडमध्ये होणार आहेत.

मोठी पाणीसाठवण क्षमता

बंधाऱ्यांच्या कामासाठी 43 कोटी 32 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाडा तालुक्यात तीन तर पोलादपूरमध्ये सात बंधारे उभारण्याचे नियोजन आहे. महाड तालुक्तात कोल, निगडे व पिंपळवाडी या गावात 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे तीन तर पोलादपूर तालुक्यात भोगावमध्ये 1, भोगाव 2, खांडज खोपड, कुडपन, साखर, गुडेकराकोंड, मोरसडे, खडकवाडी, बोरघर, कापडे या गावात दहा गेटेंड सिमेंट काँक्रीट बंधारे उभारण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांच्या मदतीने सुमारे 975.53 सघमी पण्याची साठवण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

बागायती क्षेत्र वाढणार

भारत हा कृषी प्रधान देश आहे. मात्र बे भरोशाच्या पावसामुळे सध्या देशात शेती व्यवसाय तोट्यात आहे. कधी पाऊस पडण्यास विलंब होतो, तर कधी अवकाळी पाऊस येतो. अशा पावसाचा पिकाला मोठा फटका बसतो. पावसाने ओढ दिल्यास पाण्याची दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने पिक जळून जातात. शेतकरी संकटात सापडतो. त्याचे नुकसान होते. मात्र हे दोन तालुके लवकरच या सर्व दृष्टचक्रावर मात करण्याची शक्यता आहे. पोलादपूरमध्ये सात बंधारे होणार आहेत. तसेच महाडमध्ये देखील तीन बंधारे होणार आहेत. बंधाऱ्यांमुळे या भागात पुरेशाप्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून, बागायती क्षेत्र वाढणार आहे.