अवकाळी टळली पण ढगाळ वातावरणामुळे व्हायचे तेच झाले,कांदा पीक धोक्यात, काय आहे उपाय?

| Updated on: Mar 16, 2022 | 5:10 AM

कधी नव्हे ते यंदा कांद्याचे दर हे टिकून राहिले होते. त्यामुळे नुकसान अथवा फायदा या तत्वावर आता केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कांद्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. जसे कांद्याचे दर लहरीचे असतात अगदी त्याप्रमाणेच यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गतआठवड्यात मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा वगळला तर अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मुख्य पिकांचे नुकसान टळले असले तरी ढगाळ वातावरणाचा परिणाम आता कांदा पिकावर दिसून येऊ लागला आहे.

अवकाळी टळली पण ढगाळ वातावरणामुळे व्हायचे तेच झाले,कांदा पीक धोक्यात, काय आहे उपाय?
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
Follow us on

लातूर : कधी नव्हे ते यंदा कांद्याचे दर हे टिकून राहिले होते. त्यामुळे नुकसान अथवा फायदा या तत्वावर आता केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कांद्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. जसे कांद्याचे दर लहरीचे असतात अगदी त्याप्रमाणेच यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गतआठवड्यात (Marathwada)  मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा वगळला तर अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मुख्य पिकांचे नुकसान टळले असले तरी (Cloudy Weather) ढगाळ वातावरणाचा परिणाम आता (Onion Crop) कांदा पिकावर दिसून येऊ लागला आहे. उन्हाळी कांद्याची पात ही पिवळी पडत असून मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांद्याचे वाढलेले दर आणि पीक पध्दतीमध्ये केलेला बदल याचा फायदा घेण्यासाठी महागडी औषधे फवारणी करुन पीक जोपासण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

असे मिळवा रोगावर नियंत्रण

कांदा हे हंगामी पीक आहे. वेळीच कीड-रोगराईचा बंदोबस्त केला नाही तर थेट उत्पादानावरच परिणाम होणार आहे. त्यामुळे फुलकिडे या किटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॅकेझेब कार्बेन्डाझिम 25 ग्रॅम आणि फ्रिपोनिल 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी लागणार आहे. तर प्रोपीकॅनेझोल 10 मिली व कार्बोसल्फान 20 मिली अशी दुसरी फवारणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. तरच करपा रोग आणि फुलकीडेमुळे कांद्याचे संरक्षण होणार आहे.

महागडे बियाणे खरेदी करुन लागवड

ज्याप्रमाणात कांद्याची लागवड वाढत आहे त्याच तुलनेत कांदा बियाणालाही मागणी वाढत आहे. यातच गतवर्षी निसर्गाचा लहरीपणा आणि बदलत्या हवामानामुळे पुरेशा प्रमाणात उन्हाळी कांद्यासाठीचे बिजोत्पादन हे झालेले नव्हते. त्यामुळे कांद्याच्या बियाणांचे दर हे 3 हजार 500 रुपये किलोवर पोहचले होते. असे असतानाही उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. आता पीक जोमात असले तरी गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. कांद्याची पात पिवळी पडली आहे तर वाढीवरही परिणाम होणार आहे.

मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव

कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम हा करपा रोगाचा होतो. वातावरणात बदल झाला की करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. यामुळे कांद्याची पात जळत आहे.शिवाय याचा उत्पादनावरही परिणाम होणार आहे. कांदा हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शिवाय कमीत कमी दर मिळाला तरी शेतकऱ्यांना हे कमी कालावधीतील पीक परवडते. मात्र, रोगराईचा प्रादुर्भाव झाला की उत्पादनावरील खर्चात वाढ होते. सध्या कांद्यावर मर आणि करप्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

संबंधित बातम्या :

आता उन्हात होरपळतोय फळांचा राजा, तिसऱ्या बहरातील हापूसला धोका कशाचा?

Latur Market : पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली, आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल

Onion Rate : कांदा दराचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर, 15 दिवसांमध्येच बदलले चित्र