AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता उन्हात होरपळतोय फळांचा राजा, तिसऱ्या बहरातील हापूसला धोका कशाचा?

हंगामाच्या सुरवातीपासून यंदा आंबा पिकावर नैसर्गिक संकटाचे सावट कायम होते. पहिल्या दोन बहरातील आंब्याला अतिवृष्टी आणि अवकाळीने झोडपून काढल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे. आतापर्यंत हंगाम अंतिम टप्प्यात असतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे हंगाम लांबणीवर पडत आहे. त्यामुळेच आता वाढत्या उन्हाचा देखील धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी नंतर आता वाढत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. यामुळेच हापूस आंबा उन्हामध्ये होरपळत असून लहान-लहान कैऱ्यांची गळ होऊ लागले आहे.

आता उन्हात होरपळतोय फळांचा राजा, तिसऱ्या बहरातील हापूसला धोका कशाचा?
अवकाळीनंतर आता वाढत्या उन्हामुळे आबा गळतीचा धोका निर्माण झाला आहे.
| Updated on: Mar 15, 2022 | 3:15 PM
Share

रत्नागिरी : हंगामाच्या सुरवातीपासून यंदा (Mango Fruit) आंबा पिकावर नैसर्गिक संकटाचे सावट कायम होते. पहिल्या दोन बहरातील आंब्याला अतिवृष्टी आणि (Untimely Rain) अवकाळीने झोडपून काढल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे. आतापर्यंत हंगाम अंतिम टप्प्यात असतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे हंगाम लांबणीवर पडत आहे. त्यामुळेच आता वाढत्या (Temperature Increase) उन्हाचा देखील धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी नंतर आता वाढत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. यामुळेच हापूस आंबा उन्हामध्ये होरपळत असून लहान-लहान कैऱ्यांची गळ होऊ लागले आहे. त्यामुळे ऊन, वारा आणि पाऊस या तिन्हीमधून आंब्याची सुटका झालेली नाही. मार्चच्या अखेरच्या टप्यात या बहरातील आंबा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार होता. मात्र, त्यावरही संकट ओढावत असल्याने अणखी किती उत्पादनात घट होणार हा सवाल आहे. यंदा केवळ 25 ते 30 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागल्याचे उत्पादकांनी सांगितले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात 36 अंश सेल्सिअस तापमान

मध्यंतरी दोन दिवस अवकाळी पाऊस आणि आता त्यानंतर वाढत असलेले ऊन. सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. अवकाळी पावसामुळे गोडवा उतरतो का नाही याची भ्रांत होती तर आता वाढत्या उन्हामुळे फलगळतीचा धोका निर्माण झाला आहे. यंदा हंगाम लांबणीवर आहे त्यामुळे तेवढ्याच संकटाचा सामना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दरवर्षी शेवटच्या बहरातील आंबा काढताना 30 ते 32 अंश सेल्सिअस असे तापमान असते. यंदा काढणी लांबल्यानेच ही समस्या उद्भवत आहे.

फवारणीचा खर्चही वाया, उन्हामुळेच फळगळ

गतमहिन्यात झालेल्या अवकाळीमधून कैऱ्याची जोपासणा व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करुन फवारणी केली होती. शिवाय नंतरच्या वातावरणामध्ये याचे परिणामही दिसून येऊ लागले होते. पण आता वाढलेले ऊन हे लहान कैऱ्यांना सहन होत नाही परिणामी फळगळतीला सुरवात झाली आहे. एका मागून एक संकटाची मालिका ही सुरुच आहे. अधिकचे तापमान हे कैऱ्यांना सहन होत नसल्यामुळे हे प्रकार वाढलेले आहेत.

तोडणी झालेल्या आंब्यासाठी ऊन पोषक

ज्या फळांची तोडणी झालेली आहे त्यासाठी हे ऊन चांगले आहे. अशा वातावरणामध्ये आंबा परिपक्व होण्यास उशिर लागत नाही. परिणामी रत्नागिरीतून आंब्याची आवक इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये सुरु झालेली आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील आंब्यावर उन्हाचा परिणाम होत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली, आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल

Onion Rate : कांदा दराचा लहरीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर, 15 दिवसांमध्येच बदलले चित्र

…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.