…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

यंदाचे वर्षा हे महिला शेतकरी सन्मान वर्ष असल्याची घोषणा ठाकरे सरकारने यापूर्वीच केली आहे. याचा पुन्ररउल्लेख कालच्या अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे. मात्र, सन्मान तर सोडाच पण बांधावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्याच्या कष्टाची कदर झाली तरी मिळवले असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण निसर्गाशी दोन हात करुनही पदरी नुकसान पडल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्ष बाग मोडून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली आहे.

...म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!
उत्पादन वाढीसाठी शेतकरी महिलेने पीक पध्दतीमध्ये बदल केला मात्र, विद्युत पुरवठा खंडीत केल्याने समस्या कायम आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 1:26 PM

लासलगाव : यंदाचे वर्षा हे महिला शेतकरी सन्मान वर्ष असल्याची घोषणा (State Government) ठाकरे सरकारने यापूर्वीच केली आहे. याचा पुनरउल्लेख कालच्या अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे. मात्र, सन्मान तर सोडाच पण बांधावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्याच्या कष्टाची कदर झाली तरी मिळवले असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण निसर्गाशी दोन हात करुनही पदरी नुकसान पडल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील (Women Farmer) महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्ष बाग मोडून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली आहे. पोषक वातावरण आणि अथक परीश्रमाच्या जोरावर मिरची बहरलीही मात्र, आता ऐन महत्वाच्या प्रसंगी (MSEB) महावितरणने वाढीव वीजबिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वाढते ऊन आणि गरजेच्या प्रसंगीच महावितरणने केलेली कारवाई याचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. सध्या किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलोचा दर असताना केवळ महावितरणच्या कारवाईमुळे उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. शिवाय पैसे पदरी पडताच थकबाकी अदा केली जाईल असे आश्वासनही रोहिणी शिंदे यांनी दिले आहे. मात्र, कारवाई अटळ असल्याचे सांगत कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाची कदर होणे गरजेचे आहे.

  1. महिला शेतकरी असलेल्या शिंदेची अशी ही कहाणी कोरोना प्रादुर्भावामुळे द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना गेली दोन वर्ष आपली द्राक्ष 5 ते 10 रुपये किलोप्रमाणे इतक्या मातीमोल बाजार भावाने विकण्याची वेळ आली होती यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने घेतलेले कर्ज फेडावे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न उभा राहिल्याने निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्षाच्या पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत वेगळा प्रयोग केला. या क्षेत्रावर त्यांनी शार्क वन जातीची मिरची लागवड केली आहे. बाजारात भावही चांगला आहे शिवाय मागणीही अधिक असताना केवळ वेळेत पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादनात घट होत आहे. परस्थितीशी दोन हात करुन त्यांनी हा प्रयोग केला आहे. मात्र, महिला शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष असल्याची घोषणा करणाऱ्या सरकारने चित्रही पाहणे गरजेचे आहे.
  2. पीक पध्दतीमध्ये बदल करुनही पदरी निराशाच निफाड तालुक्यातील खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी रविंद्र शिंदे यांनी द्राक्षाच्या पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत वेगळा प्रयोग केला. दोन एकरावरील द्राक्ष बाग तोडून 2 ते 3 लाख रुपये खर्च करून शार्क वन जातीची मिरची ची लागवड केली. मिरचीचे उत्पादनही चांगले आले ठोक बाजारात आज मिरचीला 80 ते 100 रुपये किलोला बाजार भावही मिळत आहे. मात्र, अस्मानी संकटानंतर महावितरणचे सुल्तानी संकट उभे राहिले आहे. कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठाच खंडीत करण्याची मोहीम सुरु आहे.अनेक ठिकाणी कृषीपंपाचे कनेक्शन तोडले जात आहे तर रोहित्र बंद केले जात असल्याने मिरचीच्या पिकाला पाणी द्यायचे कुठून हा प्रश्न रोहिणी शिंदे यांच्या समोर आहे.
  3. तर थकीत वीजबिलही अदा केले जाईल वाढत्या थकबाकीमुळे खानगाव येथील महिला शेतकरी रोहिणी शिंदे यांचा विद्युत पुरवठा हा खंडीत करण्यात आला आहे. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत झाला तर उत्पादनात भर पडेल आणि याच मिरची उत्पन्नातून महावितरणची थकबाकी अदा केली जाईल पण त्याकरिता अगोदर विद्युत पुरवठा सुरळीत होण गरजेचे असल्याचे मत रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. आता महावितरण काय पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

‘जलयुक्त’चा घोटाळा : पहिल्या टप्प्यात निलंबन आता थेट अधिकाऱ्यांना अटक, परळीतच मुरलयं पाणी!

Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक

हमालांच्या मानधानाचा प्रश्न चिघळला, वखार महामंडळासमोर 37 ट्रकमध्ये धान्य पडून, काय आहे नेमके प्रकरण?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.