Pre Monsoon : मान्सूनपूर्व पावसाने गोंदियाकरांना दिलासा, शेती मशागतीच्या कामांना वेग

| Updated on: May 26, 2022 | 4:45 PM

उन्हाळी हंगामानंतर शेतीची मशागत करुन खरिपाचा पेरा केला तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी नांगरण, मोगडणी आदी कामे उरकून घेतली आहेत. आता गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीपूर्वी जी मशागत होणार आहे त्यामुळे पेरणी कामे तर सोईस्कर होतीलच पण उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे.

Pre Monsoon : मान्सूनपूर्व पावसाने गोंदियाकरांना दिलासा, शेती मशागतीच्या कामांना वेग
Follow us on

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल झाला असून राज्यातील काही भागामध्ये (Pre-Monsoon) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये गोंदिया आणि अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे. गोंदियामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाट अन वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जिल्हावासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. (Cultivation Work) खरीप हंगामपूर्व कामासाठी देखील हा पाऊस अनुकुल मानला जात आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली तर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीन, तूर,चना इत्यादी धान्य पावसाने भिजले होते.

खरीपपूर्व मशागती कामांना वेग

उन्हाळी हंगामानंतर शेतीची मशागत करुन खरिपाचा पेरा केला तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी नांगरण, मोगडणी आदी कामे उरकून घेतली आहेत. आता गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीपूर्वी जी मशागत होणार आहे त्यामुळे पेरणी कामे तर सोईस्कर होतीलच पण उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे. यंदा सर्वकाही वेळेवर होत असल्याने धान पिकांमध्ये वाढ होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामपूर्व कामासाठी देखील हा पाऊस अनुकुल मानला जात आहे. हवामान विभागाने 5 जूनपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

पेरणीची गडबड धोक्याचीच, काय आहे सल्ला?

सध्या होत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. राज्यात 5 जूननंतर पाऊस सक्रीय होईल असा अंदाज आहे. त्यामुळे हा मान्सूनपूर्व पाऊस असून शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करु नये. खरिपाच्या पेरणीसाठी 100 मिमी पाऊस हा गरजेचाच आहे. 100 मिमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली तर फायद्याचे होणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मान्सून पूर्व पावसाचा काही प्रमाणात रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रांना सुध्दा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे सुद्धा वाचा

अमरवतीमध्ये मात्र नुकसानीचा पाऊस

अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याच्या पावसाने शहरातील झाडे उन्मळून पडली तर विद्युत वाहिनी खांब देखील आडवे झाले. यासोबतच अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर,चना इत्यादी धान्य पावसात भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या बळीराजा खरिप हंगामाची तयारी करत आहेत.बी-बियाणांचा खर्च भागावा म्हणून शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणला मात्र, शेतमाल पावसात भिजल्याने आता कमी भावात विकला जाणार आहे.