Chickpea Crop : दुष्काळात तेरावा, मुदतीपूर्वीच खरेदी केंद्र बंद, उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम

Chickpea Crop : दुष्काळात तेरावा, मुदतीपूर्वीच खरेदी केंद्र बंद, उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम

राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव खरेदी केंद्रही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 1 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

राजेंद्र खराडे

|

May 26, 2022 | 2:26 PM

लातूर : रब्बी हंगामात वाढत्या क्षेत्राबरोबर (Chickpea Crop) हरभऱ्याचे उत्पादनही वाढले आहे. शिवाय बाजारभाव आणि खरेदी केंद्रावरील दरात तब्बल 1 हजाराची तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा (Guarantee Rate) हमीभाव केंद्राकडे वाढला असतानाच (NAFED) नाफेडने अचानक खरेदी केंद्र ही बंद केली आहेत. 29 मे रोजी राज्यातील खरेदी केंद्र बंद केली जाणार होती पण अचानक हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांची तर अडचण झालीच आहे पण विक्री केलेल्या हरभऱ्याचे बिलाचे काय याबाबतही शेतकरी संभ्रमात आहे. राज्यात नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांचा माल खरेदी केंद्रावर तसेच शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिल्लक राहिला आहे. खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करून शिल्लक राहिलेला हरभरा त्वरित खरेदी करावा,’’ अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरातील तफावतीमुळे हरभरा केंद्रावर

हंगामाच्या सुरवातीपासूनच खुल्या बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात तफावत ही कायम राहिलेली आहे. यंदा नाफेडने खरेदी 5 हजार 230 रुपये दिला होता तर बाजारपेठेत 4 हजार 300 असा दर असल्याने शेतकरी हे खरेदी केंद्रावर विक्री करीत होते. घटत्या दरात शेतकऱ्यांना या हमीभाव केंद्राचा आधार होता. शिवाय प्रति क्विंटलमागे 1 हजार अतिरिक्त मिळत होते. पण राज्यातील खरेदी केंद्रे ही बंद केल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. आता वाढीव दराची प्रतिक्षा करणे किंवा आहे त्या दरात विक्री करणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांकडे आहेत.

6 दिवस अगोदरच घेतला निर्णय, केंद्रासमोर वाहनांच्या रांगा

राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव खरेदी केंद्रही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 1 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र बंदचा निर्णय होणार याची चुणूकही शेतकऱ्यांना नव्हती म्हणूनच शेतकरी हरभरा घेऊन गेले असता हा निर्णय झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील काही केंद्रासमोर वाहनांच्या रांगा कायम होत्या.

हे सुद्धा वाचा

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे काय ?

राज्य सरकारची नाफेडची अंतिम खरेदीची मुदत ही 29 मे असून त्याआधी अचानकच पाच-सहा दिवस बाकी असताना महाराष्ट्राच्या हरभरा खरेदीचे सर्वच खरेदी केंद्रे बंद केले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली आहे त्यांची थकीत रकमेमुळे तर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांची खरेदीविना अडचण झालेली आहे. केंद्र बंदबाबत कोणतीच पूर्वसूचना न देता हा निर्णय झाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. काही दिवस खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांकडे शिल्ल्क असलेल्या हरभऱ्याची खरेदी करुन घेण्याची मागणी होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें