Lemon: आता उतरती कळा, हंगामाच्या अंतिम टप्प्यात कांद्याचे तेच लिंबाचे, बाजारपेठेतले चित्र नेमके काय ?

ऐन हंगामात लिंबाची आवक घटल्याने लिंबाचा आंबटपणाही विक्रेत्यांना गोडच वाटत होता. किलोवर 250 अन नगावर म्हणले तर एक लिंबू 10 रुपयांना अशी स्थिती होती. त्यामुळे भर उन्हळ्यात लिंबू शरबतचा अस्वाद घेणेही मुश्किल झाले होते. दर वाढत असताना दुसरीकडे आवकमध्येही मोठी घट झाली होती. त्यामुळे यंदा विक्रमी दर मिळाला होता. आता हंगाम अंतिम टप्प्यात आवक वाढल्याने कांद्याची तीच लिंबाची अवस्था झाल्याचे चित्र आहे.

Lemon: आता उतरती कळा, हंगामाच्या अंतिम टप्प्यात कांद्याचे तेच लिंबाचे, बाजारपेठेतले चित्र नेमके काय ?
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:36 PM

नागपूर : शेती मालाला त्या विशिष्ट हंगामापूरतेच महत्व असते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात (Leman Rate) लिंबाचे दर गगणाला भिडले होते. एकतर लिंबू मिळतच नव्हते आणि मिळाले तर 250 रुपये किलो याप्रमाणे. (Climate Change) वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली वाढीव दराचा सर्वाधिक लाभ हा व्यापाऱ्यांनीच घेतला पण आता चित्र बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. थंडपेयाकडे नागरिक पाठ फिरवत असल्याने लिंबाच्या दरात कमालीची घसरण होत आहे. 10 रुपयाला असलेले लिंबू आता 1 रुपया आणि 50 पैशाला मिळू लागले आहे.शेतीमालाच्या दरातील अनिश्चित व अनियमितपणाचा फटका हा शेतकऱ्यांनाच कायम बसलेला आहे. आवक वाढल्याने (Nagpur) नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये एका लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत.

आवक वाढल्याचा दरावर परिणाम

ऐन हंगामात लिंबाची आवक घटल्याने लिंबाचा आंबटपणाही विक्रेत्यांना गोडच वाटत होता. किलोवर 250 अन नगावर म्हणले तर एक लिंबू 10 रुपयांना अशी स्थिती होती. त्यामुळे भर उन्हळ्यात लिंबू शरबतचा अस्वाद घेणेही मुश्किल झाले होते. दर वाढत असताना दुसरीकडे आवकमध्येही मोठी घट झाली होती. त्यामुळे यंदा विक्रमी दर मिळाला होता. आता हंगाम अंतिम टप्प्यात आवक वाढल्याने कांद्याची तीच लिंबाची अवस्था झाल्याचे चित्र आहे.

दर वाढले की फायदा व्यापाऱ्यांचा अन् पडले तर…

शेतीमालाच्या दराचे अजब गणित आहे. मालाचे दर वाढले तर थेट शेतकऱ्यांनाच फायदा होतो असे नाही. मध्यंतरी बाजारपेठेत आवक नसल्याचे भासवत ग्राहकांना अधिकच्या दराने विक्री तर मागणीच नसल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून कमी किंमतीमध्ये लिंबाची खरेदी अशीच पध्दत व्यापाऱ्यांनी राबवली होती. त्यामुळे दर वाढले तर शेकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिकचा फायदा अन् घटले तर नुकसान शेतकऱ्यांची अशी स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

मागणी घटली आवक वाढली

शेतीमालाच्या दराचे चित्र कायम बदलत राहते. त्यामुळे अधिकतर शेतकऱ्यांचेच नुकसान होते. आता लिंबाच्या मागणीत घट झाली आहे तर आवक वाढल्याचे चित्र कळमना बाजार समितीमध्ये आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊनही फायदा नाही अशी स्थिती आहे. यापेक्षा पुढे जाऊन बाजारपेठेत मागणी नसल्याचे कारण पुढे करीत व्यापारी आता शेतकऱ्यांकडून मनमानी पध्दतीने लिंबाची खरेदी करु लागले आहेत.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.