Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवर जनसागर… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठी गर्दी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर साजरा होत आहे. देशभरातून लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेने निवासाची व इतर व्यवस्था केली आहे, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आज देशभरात, विशेषतः मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या आदराने साजरा होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. काल रात्रीपासूनच खेड्यापाड्यातून लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे अनुयायांसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्यभूमीजवळील शिवाजी पार्क मैदानावर निवासासह पाण्याच्या आणि इतर मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज सकाळी आठ वाजता चैत्यभूमीवर उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहणार आहेत.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

