AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! मनसेच्या नेत्याला आई समोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मारहाण

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उरणमधील मनसेच्या नेत्याला आई समोरच मारहाण करण्यात आली. ही मारहाण भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आता नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया...

मोठी खळबळ! मनसेच्या नेत्याला आई समोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मारहाण
उरणImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 06, 2025 | 1:22 PM
Share

सध्या संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाची वाट सर्वजण पाहात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी दोन पक्षांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता उरण येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याला आई समोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांडकून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात आक्षेपार्य बोलल्यामुळे मनसेच्या सतीश पाटील या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणे आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कधी घडली घटना?

गुरुवारी रात्री मनसेच्या सतीश पाटील या मनसेच्या पदाधिकाऱ्याने  उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केली होती. ती ऐकल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, सतीश पाटील यांना आई समोरचं मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण करून भाजप आमदार महेश बालदी यांची माफी देखील मागायला लावली. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्याने उरण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

उरण हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. महेश बालदी हे उरणचे आमदार आहेत. ते पीडब्ल्यूपीआयचे प्रीतम जेएम म्हात्रे आणि शिवसेनेचे युबीटी उमेदवार मनोहर गजानन भोईर यांचा पराभव करत आमदर झाले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.