AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगाची झोप उडवणारा दावा, खळबळजनक विधान, थेट जागतिक युद्ध..

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमधील युद्धात अनेक देशांना ओढले जात आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय धक्कादायक दावा केला. ज्यामुळे जगाचे टेन्शन वाढले. काही देशांनी अजूनही या युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर जगातील अनेक देशांची झोप उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगाची झोप उडवणारा दावा, खळबळजनक विधान, थेट जागतिक युद्ध..
Donald Trump
| Updated on: Mar 03, 2026 | 9:35 AM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्ध टोकाला पोहोचले. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. इराणवर फक्त अमेरिकाच नाही तर इस्त्रायल देखील हल्ला करत आहे. तेहरानसह अनेक मोठ्या शहरांचे नुकसान करण्यात आले. इस्त्रायलकडून इराणच्या टीव्ही चॅनेल कार्यालयांवर हल्ले केली जात आहेत. इराण देखील सडेतोड उत्तर देत असून इस्त्रायलसह अमेरिकन लष्कर तळ असलेल्या देशांमध्ये इराण मोठी हल्ले करत आहे. या युद्धाच्या झळा थेट अनेक देशांना बसत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्येही वाढ झाली. हे युद्ध चार आठवडे सुरू राहण्याचा अंदाज अमेरिकेकडून वर्तवण्यात आला. साैदी अरेबियात मोठे हल्ले इराणकडून केली जात आहेत. यासोबतच दुबई विमानळावरही हल्ले केली जात आहेत. ऐन रमजानच्या पवित्र महिन्यात हे युद्ध सुरू आहे. कतारमध्येही इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिका आक्रमक भूमिकेत असून इराण विचार करणार नाही, असा हल्ला आम्ही करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नुकताच जगाची झोप उडवणारा दावा करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून जागतिक युद्धाकडे पाऊल टाकला जात असल्याचे दिसत आहे. नुकताच भाषण करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी हैराण आहे…. आता त्यांना लढायचे आहे. अगोदर हे यामध्ये सहभागी होण्यासाठी अजिबातच इच्छुक नव्हते पण आता त्यांना सहभागी व्हायचे आहे.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणवर सध्या जे हल्ले होत आहेत ती फक्त सुरूवात आहे. अमेरिका इराणवर अजून घातक हल्ले करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करत म्हटले की, बहरीन, जॉर्डन, साैदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, कतार या देशांवर हल्ले केले. इराणकडून या हल्ल्याकरिता इस्त्रायल आणि अमेरिकेला दोषी ठरवले.

आता अरब देश इराणच्या विरोधात आहेत. या देशांनी अमेरिकेसोबत मिळून संयुक्त बयान देखील जाहीर केले. यासोबतच इराणसोबतच्या युद्धात अगोदरच नाटो देशांनी अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, काही देश अजूनही तटस्थ भूमिकेत आहेत. या युद्धामध्ये आम्ही कोणतेही मदत करणार नसल्याची जर्मनीने भूमिका जाहीर केली. जर्मनीसारखे अनेक देश यामध्ये आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...