AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut On Sharad Pawar | शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...

Sanjay Raut On Sharad Pawar | शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो…

| Updated on: Mar 02, 2026 | 12:08 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भविष्यात त्यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते, अशीही राजकीय पातळीवर कुजबुज सुरू आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीत एका जागेसाठी उमेदवारीवरून चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेसला राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवण्यासाठी दोन खासदारांची आवश्यकता असल्याने महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत पक्षांतर्गत हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भविष्यात त्यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते, अशीही राजकीय पातळीवर कुजबुज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “हे सगळे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत. मी इतकी वर्षे त्यांना ओळखतो. त्यामुळे खात्रीने सांगू शकतो की शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत.” राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 02, 2026 12:08 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा