tv9 Marathi Special Report | क्लीअरन्सनंतर 14 सेकंदांत विमान कोसळलं; अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातानंतर तब्बल एक महिन्यांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. अहवालानुसार, उड्डाणापूर्वी दोन्ही पायलटची ब्रेथ अनालायझर चाचणी करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आली होती. त्यामुळे पायलट मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत नव्हते, असे स्पष्ट झाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातानंतर तब्बल एक महिन्यांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. अहवालानुसार, उड्डाणापूर्वी दोन्ही पायलटची ब्रेथ अनालायझर चाचणी करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आली होती. त्यामुळे पायलट मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत नव्हते, असे स्पष्ट झाले आहे. अपघाताच्या वेळी विमानात सुमारे 5000 LBS (अंदाजे 25000 लिटरच्या आसपास) इंधन असल्याची नोंद अहवालात आहे. विमान लँडिंगसाठी येत असताना प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर जमिनीवर आदळले, असेही नमूद करण्यात आले आहे. पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी लँडिंगच्या वेळी दृश्यमानता सुमारे 2000 मीटर होती. त्यामुळे हवामान अत्यंत प्रतिकूल नव्हते, असे प्राथमिक निरीक्षणातून दिसते. फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील उपलब्ध डेटा दिल्लीतील एआयआयबीच्या प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून क्लीअरन्स मिळाल्यानंतर अवघ्या 14 सेकंदांत विमान कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. या 14 सेकंदांत नेमके काय घडले, याचा उलगडा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्समधील सविस्तर विश्लेषणानंतरच होणार असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अंतिम अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

