AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Press | एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं

Sanjay Raut Press | एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं

| Updated on: Mar 02, 2026 | 12:39 PM
Share

शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. “मी त्यांना इतकी वर्षे ओळखतो. ते कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत चर्चांना वेग आला असून पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीत एका जागेसाठी उमेदवारीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. या चर्चांना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “महाविकास आघाडी हा तीन तिघाडा आहे, पण काम बिघाडा नाही. महायुतीतही तीन चाकी रिक्षा आहे. अशा निवडणुकांमध्ये या प्रकारच्या चर्चा होत असतात. एक जागा आहे आणि त्या एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरू राहू शकते.” उमेदवारीबाबत बोलताना राऊत म्हणाले की काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे, याची त्यांना माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत असून पक्षातील राजन विचारे आणि विनायक राऊत हे इच्छुक आहेत. “इच्छा व्यक्त करण्यास हरकत नाही, मात्र अंतिम निर्णय पक्ष आणि पक्षप्रमुख घेतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात नुकतीच चर्चा झाल्याची माहितीही राऊत यांनी दिली. लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. “मी त्यांना इतकी वर्षे ओळखतो. ते कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत चर्चांना वेग आला असून पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 02, 2026 12:39 PM

Follow Us
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report