AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Crop Loss | ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल

Hingoli Crop Loss | ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल

| Updated on: Mar 02, 2026 | 1:23 PM
Share

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह हिंगोलीमध्ये शेतकरी वर्षभर अडचणीत असतात; आता खरिप हंगामातील पिकांवर ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह हिंगोलीमध्ये शेतकरी वर्षभर अडचणीत असतात; आता खरिप हंगामातील पिकांवर ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.
यापूर्वी रब्बी हंगाम सुरू असताना वसमत तालुक्यात अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन यांसह इतर पिके नष्ट झाली होती. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपासून बाहेर पडून आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला, पण आता त्या आधुनिक पिकांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव आणि ढगाळ वातावरणामुळे संकट आले आहे. वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारामध्ये शेतकऱ्यांनी रमजान महिन्याला लक्षात ठेवून खरबुजाची लागवड केली होती. मात्र सतत ढगाळ वातावरणामुळे एकर ते दीड एकर बागेमध्ये खरबुजाच्या झाडांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. झाडांची वेल जळून जात असून फळांचे उत्पादनही धोक्यात आले आहे. मागील आठ दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील वातावरण दूषित असल्याचे शेतकऱ्यांनी नोंदवले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीत खरबूज, टरबूज आणि मिरची यांसारख्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि वारंवार निसर्गाच्या बदलत्या लहरीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 02, 2026 01:22 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा