Formula ! एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य

| Updated on: Oct 19, 2021 | 10:39 AM

हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन होणार आहे. शिवाय हरभरा पीकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनेही भूमिका घेतलेली आहे. कृषी विभागाक़डून बियाणांचा पुरवठा केला जात आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर कृषितज्ञ पंजाबराव डख यांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.

Formula ! एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीप हंगामातील (Kharif Hangam) पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  (Marathwada) ऐन काढणीच्या प्रसंगीही परतीच्या पावसाने मराठवाड्यासह विदर्भात धुमाकूळ घातल्याने पिके अद्यापही पाण्यातच आहेत. मात्र, खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, यासाठी आवश्यक आहे ते नियोजन. हरभरा (Chickpeas) हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन होणार आहे. शिवाय हरभरा पीकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनेही भूमिका घेतलेली आहे. कृषी विभागाक़डून बियाणांचा पुरवठा केला जात आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर कृषितज्ञ पंजाबराव डख यांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अचूक अंदाजाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. अचूक अंदाज आणि योग्य वेळी शेतकऱ्यांना दिल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली होती. परिणामी शेतकरी हे सावध राहिल्याने पिकाचे नुकसान झाले. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे. रब्बी हंगामातील हरभरा या पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याबाबत पंजाबराव डख यांचा सल्ला…

* शेतकरी हे बाजारातील महागडे बियाणे खरेदी करतात. पण घरगुती बियाणे वापरले तर उत्पादनही भरघोस होणार आहे. याकरिता 9211 हेच बियाणे वापरणे आवश्यक आहे. कारण दप्तरी हे देखील बियाणे चांगले आहे. मात्र, यामध्ये हरभऱ्याच्या घाटी गळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जमिनीसाठी पोषक असलेल्या 9211 याच घरगुती बियाणाचा वापर गरजेचा आहे.

* साधारणता शेतकरी हे एकरी 25 किलो बियाणे पेरतात. मात्र, हरभरा जेवढा दाट तेवढे अधिकचे उत्पादन त्यामुळे शेतकऱ्यांनी एकरी 40 ते 45 किलो बियाणे हे जमिनीत गाढणे आवश्यक आहे. त्यामुळे उतार वाढणार आहे. जेवढी दाट पेरणी तेवढे उत्पादन जास्त हेच अधिकच्या उत्पादनाचे सुत्र आहे.

* खताचे नियोजन : एकरी डीएपी ची एक बॅग व त्याच्यासोबत 5 किलो गंधक मिसळून पेरणी केल्यास पीकाची वाढ जोमात होते.

* अशी करा पेरणी : काळाच्या ओघात आता पेरणी ही ट्रक्टरद्वारेच केली जाते. मात्र, खोलवर पेरण्यास अधिकचे डिझेल लागत असल्याने ते वरच्या- वरीच सोडले जाते. त्यामुळे उगवण क्षमता ही कमी होते. त्यामुळे परेणी करताना जास्तीचे पैसे गेले तरी चालतील पण बियाणे हे जमिनीत खोलवर जाणे गरजेचे आहे. जमिनीचा ओलावा कमी झाला की, उगवण क्षमता ही वाढते. चिभडत असेलेल्या जमिन क्षेत्रात अधिकच्या खोलवर पेरणी केली की त्याच जोमात पीकाची उगवणही होते.

* पाण्याचे नियोजन : पेरणी झाली की, दुसऱ्याच दिवशी स्प्रिंक्लरने पाणी केवळ 2 तास द्यावयाचे आहे. पाटाने पाणी दिले की हरभऱ्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे दोनच तास पहिले पाणी द्यायचे तर दुसरे पाणी हे 20 दिवसांनी ते ही 4 तास स्प्रिंक्लर चालू ठेवायचे आहे. 40 दिवसांनी हरभरा फुल लागण्याच्या आगोदर तिसरे पाणी ते ही 6 तासच स्प्रिंक्लर चालू ठेवायचे आहे. हरभरा पीक फुल अवस्थेत असताना पाणी हे द्यायचे नाही. अन्यथा फुल गळण्याचे प्रमाण वाढते. अशा पध्दतीने पेरणीपासून काढणीपर्यंतचे नियोजन केले तर एकरी 16 क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनो ही चूक होऊ देऊ नका

खऱीपात अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीतील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या आहेत. याचा फारसा परिणाम हा उत्पादनावर होणार नसला तरी पेरणीपूर्वी हलक्या प्रकारची मशागत करुन वेळ खर्ची न करता थेट पेरणीला सुरवात करायची आहे. रब्बी हंगामातील हरभरा हेच मुख्य पीक राहणार आहे. त्याअनुशंगानेच प्रशासनाने देखील खताचे नियोजन केले आहे. मात्र, आता पावसाने उघडीप देताच रब्बी हंगमातील कामे उरकून घेणे आवश्यक आहे. (Rabi Season: Important Advice to Farmers for Increasing Production of Chickpeas)

संबंधित बातम्या :

नंदुरबारमध्ये पपई बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरुच, परतीच्या पावसाचा कांद्यालाही फटका

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार