RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा
रेल रोको


Kisan Rail Roko Andolan नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने आज रेल रोको आंदोलन जाहीर केले आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. जोपर्यंत लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चानं दिला आहे. आम्हाला ट्रेन कुठे थांबवायची आहे हे माहिती आहे, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. भारत सरकारकडून आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असं टिकैत म्हणाले.

संयुक्त किसान मोर्चानं रेल रोको आंदोलनादरम्यान आज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व मार्गांवर सहा तास रेल्वे रोको करणार असल्याचं सांगितलं आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडात न्याय मिळावा म्हणून संयुक्त राज्य किसान मोर्चाने गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक आणि बडतर्फ करण्याची मागणी करत देशव्यापी रेल रोको कार्यक्रम जाहीर केला आहे.

..तर शेतकऱ्यांवर रासुका अंतर्गत कारवाई करणार

लखीमपूर खेरी प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाकडून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यूपी, हरियाणा आणि पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर शेतकऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे लखनऊ पोलिसांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर रासुका लावला जाईल, असं लखनऊ पोलिसांनी म्हटलं आहे.

रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी संघटनांच्या रेल रोको आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको करण्यात येईल. आम्हाला ट्रेन कुठे थांबवायची आहे हे माहिती आहे, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. भारत सरकारकडून आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असं टिकैत म्हणाले.

इतर बातम्या:

 

Chhagan Bhujbal | मुंडे बहीण- भावाचा कलगीतुरा थांबेल – छगन भुजबळ

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय?, भुजबळ म्हणाले, अहं हं हं… ना ना ना…; मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत!

Kisan Rail Roko Andolan Live updates SKM demand union minister Ajay mishra resignation and Arrest started protest at UP Haryana Punjab over Lakhimpur Kheri Violence

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI