दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

| Updated on: Sep 09, 2021 | 4:04 PM

खरिपातील पिकांच्या नुकसानामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकूटीला आला आहे. शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरु आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये (Soyabin Rate) सोयाबीन बाजारात दाखल झाले तरी दरात कमालीची घट होणार असल्याचा अंदाज आता कृषी तज्ञ वर्तवित आहेत.

दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

लातुर :  खरिपातील पिकांच्या नुकसानामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकूटीला आला आहे. शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरु आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये (Soyabin Rate) सोयाबीन बाजारात दाखल झाले तरी दरात कमालीची घट होणार असल्याचा अंदाज आता कृषी तज्ञ वर्तवित आहेत. पावसामुळे सोयाबीनची आवक लांबणीवर पडणार आहे तर पावसामुळे काळवंडलेले सोयाबीन दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गतवर्षी खरिप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे केवळ 5 हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. यंदा सर्वकाही सुरळीत असल्याने सोयाबीनला अधिकचा दर मिळेल असा आशावाद होता. मात्र, गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता सोयाबीनची आवक सुरु झाली तरी त्याप्रमाणात मोबलता मिळणार नसल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी असून 9 हजार प्रति क्विंटल दर आहे. यंदा 15 दिवस उशिराने सोयाबीन बाजारत दाखल होणार आहे. चार दिवस झालेल्या पावसामुळे सोयाबीन हे काळवंडले असून त्याचा दर्जाही खलावलेला राहणार आहे. त्यामुळे 9 हजारावरील सोयाबीन 6 हजारवर येणार असल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.

चार हजार क्विंटलची आवक

मराठवाड्यात सोयाबीनसाठी लातुर ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी चार हजार क्विंटलची आवक आहे. यामध्ये नविन सोयाबीन हे 300 कट्टे असून त्याचा दर्जाही खलावलेला आहे. त्यामुळे आवक वाढली की आता सोयाबीन हे 6 हजारवरच येणार असल्याचे चित्र आहे.

गतवर्षीही पावसामुळेच फटका

गतवर्षीही सोयाबीन हे जोमात होते. ऐन काढणीच्या प्रसंगी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. 15 दिवसांपुर्वी सोयाबीनचे दर हे 10 हजारांवर गेले होते. बदलत्या वातावरणानुसार दरामध्ये बदल होत आहे.

सोयापेंड आयात निर्णायाचाही परिणाम

केंद्र सरकारने आगामी काळात सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सोयाबीनलच्या काढणी प्रसंगीच सोयापेंडची आवक होत असल्याने याचा परिणाम दरावर होणार हे नक्की.

उत्पादनाबरोबरच बाजारपेठतही फटका

उत्पादन वाढीसाठी शेतकरी नवनविन प्रयोर राबवित आहे. परंतु, निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी 10 हजार रुपयांपर्यंत भाव गेला होता. गतआठवड्यापासून पुन्हा दरात घट होऊ लागली आहे.

 इतर बातम्या :

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, पुणे पोलिसांकडून स्पष्ट

स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, अजित पवाराचं ठरलं!

आगे आगे देखो होता है, छगन भुजबळांच्या दोषमुक्तीवर किरीट सोमय्यांचाही शायराना अंदाजात इशारा