पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, पुणे पोलिसांकडून स्पष्ट

गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल, असं पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र सिसवे यांनी सांगितलं आहे. मागील वर्षी होती तिच आचारसंहिता यंदाही पुण्यात लागू असेल असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय.

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, पुणे पोलिसांकडून स्पष्ट
घरोघरी बाप्पांचे आगमन.
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 3:18 PM

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे राज्यातील एक आकर्षण असतं. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी पुण्यातील गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सव साधा पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल, असं पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र सिसवे यांनी सांगितलं आहे. मागील वर्षी होती तिच आचारसंहिता यंदाही पुण्यात लागू असेल असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. (No curfew in Pune during Ganeshotsav, clear from Pune police)

ऑनलाईन दर्शन घेण्याचं मंडळांचं आवाहन

दरम्यान पुण्यातील गणपती मंडळांनी नागरिकांना, भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.

1)मानाचा पहिला श्री कसबा गणपती 2)मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती 3)मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती 4) मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती 5) मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती

तसंच प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना ऑनलाईन दर्शनाचं आवाहन केलं आहे.

‘स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी’

यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.

गणेश चतुर्थीला दीड लाख मोदकांचं बुकिंग

येत्या 10 तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापना होईल. गणेशोत्सवाच्या या पहिल्या दिवशी पुण्यात दीड लाख मोदकांचं बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ग्राहकांकडून फ्रोझन मोदक आणि तळणीच्या मोदकांसाठीची मागणी वाढली आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे तर पुण्याबाहेरूनही मोदकांसाठी ऑर्डर आल्या आहेत. घरगुती मोदक बनवणाऱ्या व्यावसियकांकडेही मोदकांच्या मोठ्या ऑर्डर असल्याचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी आचारसंहिता

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

मुंबईतही कलम 144, गणेशोत्सवात जमावबंदी आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, अजित पवाराचं ठरलं!

No curfew in Pune during Ganeshotsav, clear from Pune police

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.