मुंबईतही कलम 144, गणेशोत्सवात जमावबंदी आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. 

मुंबईतही कलम 144, गणेशोत्सवात जमावबंदी आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई
हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 2:53 PM

मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही.  मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

mumbai Police guidelines

mumbai Police guidelines

पुण्यातही जमावबंदी

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय? 

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

संबंधित बातम्या  

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी; बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात

ऑनलाईन दर्शनाचा निर्णय केवळ ‘लालबागच्या राजा’ला की राज्यभरात, विजय वडेट्टीवार म्हणतात…

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.