Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या एका क्लिकवर

2020 मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. या प्रकोपापासून स्वतःचे आणि कुटुंबियांचे संरक्षण करुनच गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान खालील निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात आले आहे.

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई महापालिका


मुंबई : कोरोना प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व शासन स्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आले आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव-2021 साजरा करताना पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. 2020 मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. या प्रकोपापासून स्वतःचे आणि कुटुंबियांचे संरक्षण करुनच गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान खालील निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात आले आहे. (Important instructions to Ganesh devotees from BMC for Ganeshotsav)

मुंबई महापालिकेच्या गणेशभक्तांना सूचना

1. घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तिंनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी 2 फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.

2. सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मुखपट्टी (मास्क) वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील. तसेच शक्‍यतो सदर 10 व्यक्तिंनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी 4 फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

3. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविड-19 साथरोगापासून रक्षण करणे शक्य होईल.

4. मुंबईच्‍या महापौर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली, गणेशोत्‍सव मंडळाचे प्रतिनिधी यांच्‍या उपस्थितीत दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दूरदृश्‍य प्रणालीसह झालेल्‍या बैठकीत मागील काही दिवसांतील कोविड-19 रुग्‍णांची वाढती संख्‍या तसेच या साथरोगाची तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे. गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी असा निर्णय घेण्‍यात आला.

5. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी.

6. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

7. गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

8. घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्यक्तिंनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.

9. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.

10. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

11. शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

12. सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मुखपट्टी (मास्‍क) वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर 10 व्यक्तिंनी शक्‍यतो ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच, कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

13. सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

14. सन – 2021 गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

15. मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

16. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

17. महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

18. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

19. विसर्जनादरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मुखपट्टी / मास्‍क, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

20. प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

21. घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

22. बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

23. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 व भादवि 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

इतर बातम्या :

Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

Important instructions to Ganesh devotees from BMC for Ganeshotsav

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI