बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. (raosaheb danve gives green signal to modi express)

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात 'मोदी एक्सप्रेस' कोकणाकडे रवाना
modi express


मुंबई: गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत. (raosaheb danve gives green signal to modi express)

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली. आज सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी या एक्सप्रेसला रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. यावेळी चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करतानाच टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी चाकरमान्यांनी गणपतीची आरतीही घेतली. ही स्पेशल एक्सप्रेस काही खास स्टेशन घेऊन कोकणात दाखल होणार आहे.

प्रवाशांना मोफत अन्न

दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार आहे. 18 डब्यांची ही ट्रेन असून 1800 प्रवासी या एक्सप्रेसमधून जात आहेत. त्यांना एकवेळचं जेवणही आम्ही दिलं आहे. ही सोय पहिल्यांदाच झाली आहे.

दानवेंकडून विचारपूस

रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्सप्रेसमध्ये येऊन प्रवाशांना अन्न वाटप केलं. तसेच तुम्ही कुठून आलात? कुठे जाणार आहात? किती दिवस कोकणात राहणार आहात? तुमच्यासोबत कुटुंबातील कोण कोण आहेत? तुमची प्रकृती चांगली आहे ना?, अशी विचारपूस करतानाच प्रवास करताना आणि कोकणात गेल्यावरही कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावूनच घराबाहेर पडा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या.

दानवेंची लोकल सफर

दरम्यान, तत्पूर्वी दानवे यांनी लोकलने प्रवास करत प्रवाशांशी गप्पा मारल्या. मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर काय उपयायोजना केल्या पाहिजेत याबाबत त्यांनी प्रवाशांची मते जाणून घेतली. तसेच कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचनाही केल्या.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी यावेळी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती ऊणीव आजमभरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा नितेश राणेंनी काढला.

आता जनतेनेच विचार करावा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं. (raosaheb danve gives green signal to modi express)

संबंधित बातम्या:

कोकणात एकटाच भाजपचा आमदार तरीही ट्रेन सोडली, शिवसेनेने किमान अर्धी ट्रेन तरी सोडावी; नितेश राणेंचा टोला

मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला

खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा; पडळकरांनी वडेट्टीवारांना ललकारले

(raosaheb danve gives green signal to modi express)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI