गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी; बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात

Ganpati Festival Pune | गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी; बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात
पोलीस

पुणे: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.
गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाईल.

कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल.

गणेश चतुर्थीला दीड लाख मोदकांचं बुकिंग

येत्या 10 तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापना होईल. गणेशोत्सवाच्या या पहिल्या दिवशी पुण्यात दीड लाख मोदकांचं बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ग्राहकांकडून फ्रोझन मोदक आणि तळणीच्या मोदकांसाठीची मागणी वाढली आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे तर पुण्याबाहेरूनही मोदकांसाठी ऑर्डर आल्या आहेत. घरगुती मोदक बनवणाऱ्या व्यावसियकांकडेही मोदकांच्या मोठ्या ऑर्डर असल्याचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

‘पाच जणांना स्थिर ढोल वादनाची परवानगी द्या’

पुण्यातल्या गणेश मंडळांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. यामध्ये गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतल्या पाच जणांना स्थिर वादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्याची परवानगी द्यावी, आणि 2016 साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन

गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट! श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना यंदाही मुख्य मंदिरातच

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, ‘या’ गोष्टींवर निर्बंध

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI