AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन दर्शनाचा निर्णय केवळ ‘लालबागच्या राजा’ला की राज्यभरात, विजय वडेट्टीवार म्हणतात…

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं फक्त ॲानलाईन दर्शन (Online Darshan) होणार आहे. गर्दी टाळता यावी म्हणून ॲानलाईन दर्शनाचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

ऑनलाईन दर्शनाचा निर्णय केवळ 'लालबागच्या राजा'ला की राज्यभरात, विजय वडेट्टीवार म्हणतात...
मंत्री विजय वडेट्टीवार
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 11:19 AM
Share

नागपूर : तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं फक्त ॲानलाईन दर्शन (Online Darshan) होणार आहे. गर्दी टाळता यावी म्हणून ॲानलाईन दर्शनाचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आम्ही घेतलेला ॲानलाईन दर्शनाचा निर्णय योग्य आहे. लोक नियम पाळत नाही, गर्दी वाढते. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. मुंबईतील लालगाबगचा राजासह राज्यातील सर्व सार्वजनिक मंडळात फक्त ॲानलाईन दर्शन बंधनकारक असेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय? 

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

2. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.

7. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार  इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

8. आरती भजन कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

9. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

10 . गणपती निर्जंतुकीकरणाची तसेग वर्गल स्क्रीनिंगची पर्याप व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाच्या भाविकांसाठी शरीरिक फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

11. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ याबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

12. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

13. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे राज्य सरकारने आपल्या गाईडलानमध्ये सांगितले आहे.

संबंधित बातम्या  

Ganesh Chaturthi Guidelines 2021 : मंडपात मुखदर्शन नाहीच, राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर   

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या एका क्लिकवर

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.