स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, अजित पवाराचं ठरलं!

राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, अजित पवाराचं ठरलं!
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 2:32 PM

मुंबई : राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्याला अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करुन लढायची हा निर्णय जिल्हा पातळीवर व्हावा, असं माझं मत आहे. जिल्ह्या पातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा”

राष्ट्रवादीच्या बैठकीवर भाष्य

दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी भूमिका मांडली. आम्हाला काम करताना विकासकामाला निधी मिळत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनल्यामुळे वेगळे समीकरण झालं. स्थानिक पातळीवर तेवढा समनव्य अजून झाला नाही”

शरद पवार- मुख्यमंत्री भेट

यावेळी अजित पवारांनी शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आज राजकीय चर्चा नाही. असती तर आम्हाला बोलवलं असतं”, असं त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यात पावसाने नुकसान

तुफान पावसाने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. त्याबाबत आढावा घेण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. “आम्ही सूचना दिल्या आहेत. कधी नव्हे ते प्रचंड पाऊस पडला आहे. रस्ते, पूल, पिकांचे जनावरांचे नुकसान झाले आहे. त्यांना पंचनामे करायच्या सूचना दिल्या आहेत. आठ जिल्ह्यात पालकमंत्र्यांना जिथे नुकसान झालं तिथे जाऊन पाहणी करा अशा सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना अकाऊंट मधून पैसे काढता येईल. जी मदत द्यायची त्यासाठी निधी कमी पडणार नाही. नुकसान प्रचंड झालं आहे. पंचनामे करायचे, तातडीची मदत करायची, अहवाल आल्यावर मुख्यमंत्री मग मदतीबाबत निर्णय घेतील, असं अजित पवारांनी सांगितलं.

मदतीचे निकष

SDRF निकष कमी आहेत ते 2015 मधील आहेत, आता 2021 आहेत. निकषामध्ये वाढ झाली पाहिजे. राज्यात चक्रीवादळ,पूर,अतिवृष्टी झाली. आम्हाला निकषापेक्षा जास्तीची मदत करावी लागली. आम्हाला पर्याय नव्हता, असं अजित पवार म्हणाले.

 कोरोना नियम

काही भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आता गणपती उत्सव आहे. मार्केटमध्ये गर्दी आहे. यामुळे कोरोना रुग्ण वाढले तर, म्हणून टास्क फोर्स, केंद्राने सूचना दिली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता बघून नियम लावले. उद्या काही झालं तर दोष सरकारवर येईल, असं अजित पवारांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या

साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की, कोर्टाच्या निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज

छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.