AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 24 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री बनली डॉक्टर; 1700 कोटींचा ब्लॉकबस्टर तिच्या नावे, चित्रपटांमध्ये काम करता-करता पूर्ण केलं MBBS

ही अभिनेत्री अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'मध्ये झळकली होती. या चित्रपटाने जगभरात 1700 कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटांमध्ये काम करता करता तिने सहा वर्षांत एमबीबीएसची पदवी संपादित केली आहे. नुकताच तिचा दीक्षांत समारोह पार पडला.

वयाच्या 24 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री बनली डॉक्टर; 1700 कोटींचा ब्लॉकबस्टर तिच्या नावे, चित्रपटांमध्ये काम करता-करता पूर्ण केलं MBBS
प्रसिद्ध अभिनेत्रीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2026 | 1:07 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 24 वर्षी एमबीबीएसची पदवी प्राप्त करत डॉक्टर बनली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती या पदवीसाठी कठोर मेहनत करत होती. विशेष म्हणजे चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच ती अभ्यासासाठीही वेळ काढत होती. सहा वर्षांच्या या मेहनतीचं फळ अखेर तिला मिळालं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कन्नड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय श्रीलीला आहे. चित्रपटसृष्टीत यशस्वी करिअर सुरू ठेवून तिने एमबीबीएसची डिग्री घेतली आहे. ती 2020 च्या बॅचची असून ही पदवी मिळवण्यासाठी तिला 6 वर्षे लागली आहेत. सोशल मीडियावर श्रीलीलाच्या दीक्षांत समारोहाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय.

वैद्यकीय शिक्षण आणि शूटिंगचं व्यस्त शेड्युल यांच्यात समतोल साधून तिने हे यश संपादन केलं आहे. चित्रपटांच्या शूटिंगचं शेड्युल व्यस्त असतानाही तिने वेळ मिळेल तेव्हा अभ्यास केला. याशिवाय प्रमोशनसाठीच्या कार्यक्रमांनाही तिला सतत हजर राहावं लागत होतं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळताना श्रीलीलाची तारेवरची कसरत झाली. अखेर शिस्त, एकाग्रता आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर तिने एमबीबीएसची पदवी मिळवली.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये ती स्टेजवर दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभी असल्याची पहायला मिळत आहे. पदवी स्वीकारल्यानंतर ती तिच्या कुटुंबीयांना मिठी मारते आणि नंतर मंचावरून खाली उतरते. आणखी एका व्हिडीओमध्ये विद्यार्थी हिप्पोक्रॅटकची शपथ घेताना दिसत आहेत. जेव्हा ते अधिकृतपणे 2020 च्या बॅचचे डॉक्टर झाल्याची घोषणा केली जाते, तेव्हा श्रीलीला हसते आणि तिच्या मैत्रिणींसह आनंद साजरा करते.

कोण आहे श्रीलीला?

श्रीलीलाचा जन्म 2001 मध्ये अमेरिकेतील डेट्रॉईट इथं एका तेलुगू कुटुंबात झाला. ती बेंगळुरूमध्ये लहानाची मोठी झाली. श्रीलीलाची आई स्वर्णलता या बेंगळुरूमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. तिने 2017 मध्ये ‘चित्रांगदा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. कन्नड भाषेतील या चित्रपटाचं नाव ‘किस’ असं होतं. ती लवकरच अनुराग बासू दिग्दर्शित बॉलिवूड चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...