सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट

| Updated on: Oct 05, 2021 | 3:04 PM

खरीप हंगामात सर्वात शेवटी तूरीची काढणी असते. त्यामुळे अधिकचा काळ शेतामध्ये असणाऱ्या या पीकावर (Heavy Rain) पावसाचा परिणाम होत नाही पण यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाडा आणि विदर्भात झाला आहे. त्यामुळे तूर ही पिवळी पडत आहे. देशाच्या तुलनेत तुरीचे निम्मे उत्पादन हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. या दोन राज्यातही पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे यंदा सोयाबीन, उडदाबरोबरच तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट
पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याने तुर पिवळी पडत असल्याचे चित्र आहे
Follow us on

लातूर : गेल्या महिन्याभरापासून पावसाने थैमान घातलेले आहे. खरीपातील (Kharif) तूरीवर तसा पावसाचा परिणाम होत नाही पण यंदा अतिरक्त पाऊस झाला असून तुरीच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. (tur cultivation in Maharashtra) खरीप हंगामात सर्वात शेवटी तूरीची काढणी असते. त्यामुळे अधिकचा काळ शेतामध्ये असणाऱ्या या पीकावर (Heavy Rain) पावसाचा परिणाम होत नाही पण यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाडा आणि विदर्भात झाला आहे. त्यामुळे तूर ही पिवळी पडत आहे. देशाच्या तुलनेत तुरीचे निम्मे उत्पादन हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. या दोन राज्यातही पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे यंदा सोयाबीन, उडदाबरोबरच तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

सध्या तुर ही फुलोऱ्यात देखील नाही. मात्र, शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने तुरची झाड ही वटून गेली आहे. शिवाय अतिरक्त पाऊस झाल्याने तुरीच्या फंद्या ह्या गळून पडल्या आहेत तर ऐन वाढीच्या दरम्यानच तुरीचा खराटा झाला असल्याचे चित्र मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात झाले आहे. तुरीचे पीक हे डिसेंबर महिन्यापासून बाजारात दाखल होत असते. बहुतेक ठिकाणी पीक अजून फुलोऱ्याच्या अवस्थेतही नाही.

या सर्व प्रतिकूल परस्थितीचा परिणाम पुढील काळात उत्पादकतेवर होणार आहे. खरीपाच्या सुरवातीला सोयाबीन, उडीद, मूग, तुर ही सर्वच पीके जोमात होती. पण पेरणी झाली की पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिकांच्या वाढीवर याचा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर पीक जोपासण्याचा प्रयत्न केला. या प्रतिकूल परस्थितीतून पिकांची सुधारणा होत असतानाच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली हजेरी आजही कायम आहे. पावसामधील सातत्य आणि जोर यामुळे पीकांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकात तुरीचा पेरा अधिक

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात तुरीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात 7.50 लाख हेक्टरवर खरिपाची लागवड असून पैकी 5.50 लाख हेक्टरवर एकट्या तुरीचे पीक आहे. या जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत पावसाने थैमान घातले. पावसाचे पाणी तर शेतामध्ये आहेच शिवाय नद्या आणि नाल्यांतील पाणी ही शेतामध्ये शिरत असल्याने पीक पाण्यात आहे. पावसाचा अधिक परिणाम हा सोयाबीन, उडदावर होतो मात्र, सलग आठ दिवस तुर पाण्यात राहिली तर पिवळी पडण्यास सुरवात होते. हीच परस्थिती आता या दोन्ही राज्यातील पिकांची झालेली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील तुर पाण्यातच

अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अजूनही शेतात कामासाठी वाफसा नाही. ठिकठिकाणी तूर पाण्यात उभी आहे. नदी, ओढे, तळ्यांकाठची तूर अद्यापही पाण्यात आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तुरीच्या पिकाला कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यांत जास्त नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या तुरीची अवस्था काय?

पावसाने काही भागांमध्ये उघडीप दिली असली तरी बीड, उस्मानाबाद तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यात पावसामध्ये सातत्य आहे. गेल्या सात दिवसांपासून खरीपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. सध्या सोयाबीन काढणीची कामे सुरु आहेत तर तूर ही पिवळी पडत आहे. वाऱ्यामुळे तुर ही आडवीही झालेली आहे. (Rain will also affect tur crop, reduce production)

संबंधित बातम्या :

कांदा चाळ उभारणी अन् महत्व ; अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा

‘8 अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? कसा काढायचा उतारा अन् त्याचे फायदे?

कांदा चाळीचे महत्व कळाले, साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याचे दर वधारले