‘8 अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? कसा काढायचा उतारा अन् त्याचे फायदे?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: राजेंद्र खराडे

Updated on: Oct 05, 2021 | 12:09 PM

शेतजमिनीची खरेदी असो की विक्री सातबारा उतारा आणि त्याला लागूनच मागणी होते ती 'आठ अ' ची. सातबारा उतारावर जमिन कोणाच्या मालकीची आहे. मुळ मालक कोण आहे. जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले?

'8 अ' चा उतारा म्हणजे नेमकं काय? कसा काढायचा उतारा अन् त्याचे फायदे?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : शेतजमिनीची खरेदी असो की विक्री सातबारा उतारा आणि त्याला लागूनच मागणी होते ती ‘आठ अ’ ची. सातबारा उतारावर जमिन कोणाच्या मालकीची आहे. मुळ मालक कोण आहे. जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले?

यासंबधीची माहिती सातबारा, फेरफार बदल या रुपाने तहसील कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. मात्र,‘आठ अ’ चा उतारा कळत नाही. तो कसा काढायचा हेही काही लोकांना माहिती नसते. त्याचा काय फायदा होतो हे देखील माहित नसते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘आठ अ’च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या ‘त्या’ गावातील एकूण जमिनींविषयी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते.

‘आठ अ’चा उतारा कसा मिळवायचा

Google च्या होमपेजवर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जा या ठिकाणी ‘सातबारा’, ‘आठ अ’ पाहण्याचे पर्याय समोर दिसतील. यामध्ये नंतर तुम्हाला विभाग निवडायचा आहे. यामध्ये सातबारा की आठ ‘अ’ हे काढायचे ठरवावे लागणार आहे. नंतर ‘आठ अ’ वर क्लीक करा

त्यांनतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करा

खाते नंबर क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहा

त्यांनतर सर्चवर क्लिक करा

तुम्हाला तुमचा ‘आठ अ’ चा उतारा मिळतो.

तलाठी कार्यालयातून देखील आठ अ उतारा घेता येतो.

आपण ‘आठ अ’चा उतारा कसा वाचायचा हे पाहू.

जर तुम्ही ऑनलाईन आठ अ चा उतारा काढला तर तुम्हाला सर्वात वरती

१) डाव्या कोपऱ्यात वर्ष दिसेल

२) उजव्या कोपऱ्यात तुम्ही ज्या दिवशी उतारा काढत आहेत त्याची तारीख येते

३) त्यानंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव, मध्यभागी तालुका आणि उजव्या बाजूला जिल्ह्याचे नाव असते.

‘आठ अ’ चा फायदा

१) एकाच मालकाची वेगवेळ्यात गटात असलेली एकूण जमीन कळते.

२) प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी उपयुक्त

३) जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमीन घेणाऱ्या माणसाला ती जमीन नक्की कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते. त्यामुळे फसवणुकीला आळा बसतो. (how-to-get-8-अ-extracts-important-news-for-farmers)

संबंधित बातम्या :

कांदा चाळीचे महत्व कळाले, साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याचे दर वधारले

प्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत

पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI