प्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत

सौर प्रकल्पांमध्ये निर्मित होणारी वीज थेट महावितरणाला विकता येणार तसेच हे प्रकल्प उभारणीसाठी जमिन भाडेतत्वार दिली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी राहणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निविदा भरण्याची आजची (मंगळवारची) शेवटची मुदत आहे. त्यामुळे निविदामध्ये भाग घेण्याचे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Oct 05, 2021 | 10:36 AM

लातूर : सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे (solar pump ) शेतकऱ्यांना पडीक क्षेत्रही वहीत करण्याची संधी तर मिळणार आहे. ज्या भागात आतापर्यंत विद्युत पुरवठा झालेला नाही अशा दुर्गम भागांमध्ये हा प्रकल्प उभारता येणार आहे. (Mahavitaran) यामुळे विजेचा प्रश्न तर मिटणार आहेच शिवाय शेतकरी तसेच सौर प्रकल्प उभारण्यास इच्छूक असणाऱ्यांना देखील याधून आर्थिक प्राप्ती होणार आहे.

सौर प्रकल्पांमध्ये निर्मित होणारी वीज थेट महावितरणाला विकता येणार तसेच हे प्रकल्प उभारणीसाठी जमिन भाडेतत्वार दिली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी राहणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निविदा भरण्याची आजची (मंगळवारची) शेवटची मुदत आहे. त्यामुळे निविदामध्ये भाग घेण्याचे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टल वर भेट द्यावी.

अशा पध्दतीने होणार अंमलबजावणी

या योजनेअंतर्गत 0.5 ते 2 मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA)विकसित करु शकणार आहेत. जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते सौर ऊर्जा प्रकल्प विकसीत करण्याचा पर्याय निवडू शकणार आहेत. अशा परिस्थितीत भाडे पट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे. हे प्रकल्प जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टिल्ट रचना वापरुनही उभारता येईल जेणेकरुन शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टी व्यतिरिक्त पिकांच्या लागवडीसाठी होणार आहे. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरण मार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतील. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

कुणाला घेता येणार सहभाग

प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. अनामत रक्कम रु. 1 लाख/मेगावॅट , परफॉर्मनस बँक गॅरंटी रु. 5 लाख/मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वत करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून 25 वर्षाकरिता रु. 3.10 प्रति युनिट दराने राहील.

अखेरच्या दिवशी सहभागी होण्याचे अवाहन

या योजनेअंतर्गत महावितरणने 487 मे.वॅ. करिता निविदा जाहिर केल्या आहेत आणि निविदा भरण्याची शेवटची तारीख दि. 05 ऑक्टोबर 2021 (मंगळवार) आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टल वर भेट द्यावी लागणार आहे. (Pradhan Mantri Kusum Yojana, final bid for construction of solar project)

संबंधित बातम्या :

पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल

‘या’ कारणांमुळे घसरले चिकन, अंड्याचे दर ; दीड वर्षापासून वाढले होते भाव

कारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें