पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल

ज्या भागातील सर्व्हेक्षण यापुर्वी झालेले आहे अशा भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे (Panchnama) पंचनामे नंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. याच धास्तीने शेतकरी आता पीक विमा तक्रारींवर भर देत आहे. नुकसानीनंतर उत्पादनापेक्षा पीकविमा मदतीचाच हातभार मिळणार असल्याने आता तक्रार दाखल करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलेले आहे.

पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल
संग्रहीत छायाचित्र

राजेंद्र खराडे : लातूर : पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील (Marathwada) खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु असली तरी शासनाच्या एका निर्णयामुळे नुकसानीच्या दाव्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. ज्या भागातील सर्व्हेक्षण यापुर्वी झालेले आहे अशा भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे (Panchnama) पंचनामे नंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. याच धास्तीने शेतकरी आता पीक विमा तक्रारींवर भर देत आहे. नुकसानीनंतर उत्पादनापेक्षा पीकविमा मदतीचाच हातभार मिळणार असल्याने आता तक्रार दाखल करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलेले आहे.

ऑगस्ट पहिल्या आठवड्यापासून मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पावसाने लावलेली हजेरी आजही कायम आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद तसेच सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना स्व:ताच मोबाईलद्वारे नुकसानीचा दावा करावा लागत आहे. तर दुसरीकडे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येतही होते.

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवालही विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सपूर्द करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेले होते. पंचनामे केल्यानंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. मात्र, एकदा सर्व्हेक्षण झाले की त्या भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नाही अशी भुमिका प्रशासनाची आहे.

त्यामुळे शेतकरीच आता नुकसानीचे दावे करण्यात गुंग आहे. मोबाईलद्वारे तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीकडून तरी मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातून आता तक्रारीचा आकडा हा वाढत आहे.

यामुळे नाहीत राबवली जात नाही दुबार प्रक्रीया

पावसाने पीकाचे नुकसान झाले तर त्याची पाहणी करुन पंचनामे ही खरी प्रक्रीया आहे. मात्र, 10 दिवसांपूर्वीच मराठवाडा आणि विदर्भातील पीक नुकसानीचे पंचनामे हे झालेले आहेत. शिवाय सध्याही पावसाची संततधार तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे या पुर्वी पंचनामे झालेल्या भागात पुन्हा सर्व्हेक्षण आणि पंचनामे होणार नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. पुन्हा ही यंत्रणा राबवण्यात आली तर अनेत ठिकाणचे पंचनामे हे वेळेक पूर्ण होणार नसल्याचेही कारण दिले जात आहे.

म्हणून वाढत आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारीचा आकडा

शासनाने पुर्वी पंचनामे झालेल्या भागात पुन्हा सर्व्हेक्षण आणि पंचनामे होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना आशा आहे ती विमा कंपनीच्या मदतीची. त्यामुळे नुकसामीच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. अमरावती विभागात गेल्या आठवड्याभरात 2 लाख 63 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रशासनाकडून विमा भरपाईसंदर्भात काय निर्णय होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

या सहा पध्दतीने नोंदवता येणार तक्रार

1) शेतकऱ्यांना ‘क्रॅप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.

4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.

5) पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.

6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे. (Shasana’s decision makes farmers desperate, farmers try to get compensation)

संबंधित बातम्या :

‘या’ कारणांमुळे घसरले चिकन, अंड्याचे दर ; दीड वर्षापासून वाढले होते भाव

कारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

लाळ्या-खुरकूताच्या लसीकरणाला सुरवात, अशी घ्या जनावरांची काळजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI