AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या घरावर कुख्यात गुंडाची करडी नजर… कुटुंबातील सदस्याला धमकी आणि…

अभिनेता सलमान खान याच्या घरावर आणि कुटुंबियांवर गुंडाची करडी नजर... रणवीर सिंग याला धमकी मिळाल्यानंतर भाईजानच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्याला धमकी...

सलमान खानच्या घरावर कुख्यात गुंडाची करडी नजर...  कुटुंबातील सदस्याला धमकी आणि...
Salman khan
| Updated on: Feb 12, 2026 | 10:10 AM
Share

अभिनेता सलमान खान याला लॉरेन्स बिष्णोई गँगने अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एवढंच नाही तर, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आला. आता सलमान खान याच्या बहिणीच्या पतीला लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी दिली आहे. अर्पिता शर्मा हिचा पती आणि अभिनेता आयुष शर्मा याला ईमेल करत धमकी देण्यात आली आहे. आयुष याला ईमेल पाठवणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी सांगितले, परंतु अधिक माहिती दिली नाही. अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवरून धमकी मिळाल्याच्या एका दिवसानंतर आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी, अभिनेता आयुष शर्माला मिळालेल्या धमकीच्या ईमेलची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सांगितलं की, आयुषला बुधवारी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी ही धमकी मिळाली आहे.

अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, गुन्हे शाखा हा ईमेल खरा आहे की कोणीतरी केलेला विनोद आहे याची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अभिनेता रणवीर सिंग याला देखील अज्ञात व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपवर धमक्या मिळाल्या आहेत. धमकी मिळाल्यानंतर रणवीर आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आहे की, धुरंधर फेम अभिनेता रणवीर याला धमकी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका व्यक्तीने दिली असेल. गेल्या आठवड्यात, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत लॉरेन्स बिष्णोई गँगने गोळीबाराची जबाबदारी होती.

रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर अभिनेता रणवीर सिंहलाही धमकीचा मेसेज मिळाला होता. ही धमकी त्याला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली होती. रणवीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सतत धमक्या येत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातारवरण आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...