कांदा चाळ उभारणी अन् महत्व ; अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा

कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने योग्य वेळी त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या पदरी पडतात...त्यामुळे कांदा चाळ कशी उभी केली जाते..याला अनुदान काय आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

कांदा चाळ उभारणी अन् महत्व ; अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 1:50 PM

लातूर : कांद्याचे उत्पादन यापेक्षा झालेले उत्पादन साठवूण ठेवणे अधिक महत्वाचे आहे. (onion chawl) कारण कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे त्याची योग्य साठवणूक झाली तर योग्य दर मिळणार आहे. सध्या (Rabbi Hangam) रब्बी हंगामातलाच म्हणजे फेब्रुवारीमध्ये तयार झालेला कांदा हा बाजारात दाखल होत असून त्यालाच अधिकचा दर मिळत आहे. हे सर्व शक्य आहे ते कांदाचाळ मुळे. कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने योग्य वेळी त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या पदरी पडतात…त्यामुळे कांदा चाळ कशी उभी केली जाते..याला अनुदान काय आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

रब्बी हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांनामाफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत अनुदान दिले जाते. तर यासाठी विभागाच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयांशी संपर्क महत्वाचा आहे.

कांद्याची साठवणूक का गरजेची आहे.

काद्याची योग्य प्रकारे साठवण न केल्यास 45-60 टक्क्यांपर्यंत त्याचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची योग्य पध्दतीने साठवणूक होणे गरजेचे आहे. कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवण केल्यास पूर्णपणे नुकसान टळेल असे नाही पण15 ते 20 टक्क्यांपर्यंत नुकसान टळेल हे नक्की. कारण कांदाचाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळे होणारे नुकसान टाळून शेतक-याला आर्थिक फायदा वाढविता येऊ शकतो.

अनुदान कीती आहे?

1 टन कांदा चाळ बांधकामासाठी 6 हजार रुपये मोजावे लागतात. या रकमेच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान आहे. किंवा कांदा चाळ उभारणीला आलेल्या खर्चाची 25 टक्के रक्कम अनुदानपोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे. वैयक्तिक शेतकऱ्यास जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येत आहे.

कसा घ्यावा लाभ

कादाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी शेतकऱ्याने किंवा संस्थांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून घेणे गरजेचे आहे. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती सादर करावा लागतो. यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत ते आपण पाहू. वैयक्तिक शेतकऱ्यासाठी : 1. विहीत नमुन्यातील अर्ज.

2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडाव लागणार आहे.

3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.

4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.

5. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.

6. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.

7. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.

8. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.

कांदा चाळीची उभारणी करताना घ्यावयाची काळजी

कांद्याला सर्व बाजूंनी हवा खेळती राहील या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत.

1 जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडानुसार सिमेंट काँक्रेटचे कॉलम उभारणे आवश्यक आहे.

2 कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधंनकाराक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी लागते.

3 या कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा.

4 एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्रे यांचा वापर करावा.

5. 25 मे.टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट, बाजुची उंच 8 फुट मधली उंची 11.1 फुट दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंदी 5 फुट , कांदाचाळीची एकुण रुंदी 3.9 मी अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट पेक्षा जास्त नसावी. 50 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील हे पाहणे महत्वाचे आहे.

6 कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी.

7 चाळीच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा.

8 कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे. (Onion chawl construction process, subsidy for farmers and everything)

संबंधित बातम्या :

‘आठ अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? कसा काढायचा उतारा अन् त्याचे फायदे?

कांदा चाळीचे महत्व कळाले, साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याचे दर वधारले

प्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.