एकदा लागवड करा, वर्षातून चार वेळा उत्पन्न मिळवा, दुष्काळी भागासाठी हे पीक वरदान

Sugar Cane- Stevia: मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणाऱ्या पिकांकडे सध्या शेतकरी वर्ग वळला. ज्यांच्याकडे विहिरीला आणि बोअरला पाणी आहे. त्यांच्यासाठी ऊसाला पर्यायी पीकं आहे. सध्या अनेक कंपन्या ही वनस्पती खरेदी करत आहेत. बाजारातही त्याला चांगलीच मागणी आहे.

एकदा लागवड करा, वर्षातून चार वेळा उत्पन्न मिळवा, दुष्काळी भागासाठी हे पीक वरदान
ऊसाला खास पर्याय, दुष्काळी भागासाठी हे पीक वरदान
| Updated on: Oct 17, 2026 | 1:32 PM

दुष्काळाने तोंड वासल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अनेकांनी उभ्या पिकांवर रोटावेटर फिरवला आहे. काहींनी मोसंबी तोडली आहे. काहींचा ऊस वाळून गेला आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणाऱ्या पिकांकडे सध्या शेतकरी वर्ग वळला. ज्यांच्याकडे विहिरीला आणि बोअरला पाणी आहे. ते शेतकरी कमी पाण्यातील पिकांकडे वळाले आहेत. ते पर्याय शोधत आहे. ऊसाला पर्याय म्हणून स्टीव्हिया (Stevia) या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आपल्याकडे या वनस्पतीला गोड तुळस असेही म्हणतात. या वनस्पतीत नैसर्गिक गोडवा असतो. या वनस्पतीची पानं ऊसाला पर्याय म्हणून वापरली जातात. यामध्ये साखरेपेक्षा 300 पट अधिक गोडवा असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे ही वनस्पती झिरो कॅलरी गटातील आहे.

एकदाच लागवड आणि 5 वर्षे मोठे उत्पादन

Loading...

स्टीव्हिया पीक हे बहुवार्षिक मानलं जातं. शेतकऱ्यानं या पिकांची एकदा लागवड केली की, पुढील 4 ते 5 वर्षे दरवर्षी तीन ते चार वेळा या पिकाच्या पानाची तोडणी करता येते. एकदाच लावलेले पीक वारंवार तोडणीसाठी उपयोगी ठरते. बाजारात याच्या वाळलेल्या पानांना आणि पावडरला मोठी मागणी आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी याची उत्पादनं बाजारात आणली आहे.

स्टीव्हियाला कमी पाणी लागते

ऊसाच्या तुलनेत आणि इतर पिकांच्या तुलनेत स्टीव्हियाला कमी पाणी लागते. त्यात जर तुम्ही तुषार सिंचन, ठिबक सिंचनाची सोय केली असेल तर पाण्याची आणि वेळेची बचत होते. या पिकाला अधिक पाणी चालत नाही. पाट करून पाणी दिल्यास फटका बसू शकतो. यामुळे जमिनीत ओल राहील इतकेच पाणी या पिकाला चांगले मानले जाते. ठिबक सिंचनाचा प्रयोग केल्यास मोठा फायदा होऊ शकतो.

दुष्काळग्रस्त भागासाठी हे पीक वरदान ?

दुष्काळग्रस्त आणि कोरडवाहू पट्ट्यात स्टीव्हिया ही अतिशय उत्तम आणि फायदेशीर पीक ठरू शकते. हे पीक कमी पाण्यात तग धरते. मराठवाडा, विदर्भ सारख्या पट्ट्यात हे पीक तग धरू शकते. या पिकासाठी जास्त पाण्याचा उपसा करावा लागत नाही. ऊसाला स्टीव्हिया हा एक शाश्वत पर्याय मानल्या जात आहे.

देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्याबाबत नागरीक जागरूक झाल्याने आता रासायनिक साखरेऐवजी स्टीव्हियापासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक गोडव्याची मागणी आणि वापर वाढला आहे. औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या, फूड आणि बेव्हरेज कंपन्या या झाडाच्या पानांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी ही वनस्पती मालामाल करणारी ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us