Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!

| Updated on: Jul 08, 2022 | 3:57 PM

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत.

Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!
खत विक्रीसाठी डिस्पेच आयडी न मिळाल्याने पालघर जिल्ह्यात खत विक्रीला ब्रेक आहे.
Follow us on

पालघर : पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता (Kharif Season) खरिपाची लगबग सुरु झाली आहे. आठ दिवसांमध्ये खरीप हंगामाबाबत चित्र बदलले आहे. त्यामुळे (Sowing) पेरणीचा टक्का झपाट्याने वाढणार असे तुम्हाला वाटत असेल पण स्थानिक पातळीवर भलत्याच अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पालघरातील अनेक (Agricultural Service Centre) कृषी सेवा केंद्राकडे केवळ आरसीएफ हा डिस्पेच आयडी नसल्याने खताचे वाटप रखडले आहे. आतापर्यंत खरिपाला नैसर्गिक संकट होते आथा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली आहे तर दुकानदारांकडून खत वाटपास विलंब होत आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच अवस्था झाली आहे.

आरसीएफ म्हणजे नेमके काय?

कृषी सेवा केंद्रांना खताचा पुरवठा तर केला जातो पण खत कंपनीकडून ही संबंधित विक्रेत्यांना डिस्पेच आयडी मिळत नाही. खत कंपनीला खतावरील अनुदान मिळावे म्हणून हा कोड महत्वाचा असतो. तो कृषी सेवा केंद्र चालकांना सागितल्यावरच त्यांना खताची विक्री करता येते. मात्र, आरसीएफकडून हा आयडीच दिला गेला नसल्याने विक्रेत्यांकडे खत आहे पण ते विक्री करता येईना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वकाही पोषक असताना आता तांत्रिक अडचणीमुळे खरीप पेरणीला ब्रेक लागला आहे.

शेतकऱ्यांची तोबा गर्दी

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत. पण अनेक ठिकाणी तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. पक्के बील घेतले तर फसवणूक झाल्यास पुन्हा त्याच्याकडून वसुलीसाठी सोपे होते.