AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीनची घसरण सुरुच, तुरीला मात्र हमीभावापेक्षा अधिकचा दर, कशामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र?

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरात सुधारणा नाहीतर उलट दर घसरु लागले आहेत. केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता. शिवाय आता दरही घटले आहेत. असे असताना दुसरीकडे आयात शुल्क सेवा ही कमीच ठेवण्यात आली आहे.

Latur Market : सोयाबीनची घसरण सुरुच, तुरीला मात्र हमीभावापेक्षा अधिकचा दर, कशामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र?
हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात घसऱण सुरु आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 08, 2022 | 3:14 PM
Share

लातूर : एकीकडे यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत  (Soybean Rate) सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घटत आहेत. यंदा उशिरा खरिपातील पेरण्या झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मुगाला डावलून सोयाबीनवर भर दिला आहे. असे असताना दर झपाट्याने घटत असतील सोयाबीनला भविष्य काय राहणार असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे हंगामाच्या सुरवातीपासून तुरीला कधी 6 हजार 300 पेक्षा अधिकचा दर नव्हता पण आता तुरीच्या दरात वाढ होऊन तूर 6 हजार 700 रुपये क्विंटलवर स्थिरावली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील  (Agricultural prices) शेतीमालाच्या दरात झपाट्याने बदल होत आहेत. हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने त्यालाही उठाव राहिलेला नाही. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे. तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर होता.

सोयाबीनच्या दरात कशामुळे घसरण?

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरात सुधारणा नाहीतर उलट दर घसरु लागले आहेत. केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता. शिवाय आता दरही घटले आहेत. असे असताना दुसरीकडे आयात शुल्क सेवा ही कमीच ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता तरी केंद्र सरकराने आयात शुल्क सेवा वाढवण्याची मागणी सोयाबीन प्रोसेसर युनियनने केंद्राकडे केली आहे.

तुरीच्या दरात प्रथमच वाढ

गतवर्षीच्या खरिपातील तूर आणि सोयाबीनची सध्या बाजारपेठेत आवक होत आहे. असे असले तरी तुरीच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर असलेले दर आता 6 हजार 700 वर येऊन ठेपले आहेत. तर नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर होता. खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर तुरीच्या दरात घसरण होईल असा अंदाज होता पण उलट तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोयाबीनपेक्षा तुरीला अधिकचा दर मिळत आहे.

असे आहेत मुख्य पिकांचे दर

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरिपाची लगबग आणि लागून राहिलेला पाऊस यामुळे आवक कमी आहे. असे असले तरी सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी साठवलेला माल विक्री करीत आहे. सध्या मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार 100 रुपये असा सरासरी दर आहे. तर तुरीच्या दरात वाढ झाली असून 6 हजार 700 रुपये प्रति क्विंटल दर आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर मिळत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?