Rabi Season: हरभऱ्याचे क्षेत्र वाढले-उत्पादन घटले, अंतिम टप्प्यात नेमके काय झाले ?

| Updated on: Feb 23, 2022 | 2:57 PM

रब्बी हंगामातील मुख्य पीक हे ज्वारी असले तरी यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीसाठी हरभऱ्याचा पर्याय निवडला होता. मराठवाड्यात सरासरीच्या दुपटीने हरभऱ्याचा पेरा झाला होता. पण क्षेत्र वाढले म्हणून उत्पादन वाढते असे नाही. सध्या हरभऱ्याची काढणी सुरु आहे. हरभऱ्याच्या उतारावरुन उत्पादन निदर्शानास येऊ लागले आहे. रोगराईच्या प्रादुर्भामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.

Rabi Season: हरभऱ्याचे क्षेत्र वाढले-उत्पादन घटले, अंतिम टप्प्यात नेमके काय झाले ?
रब्बी हंगामाती हरभरा पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे.
Follow us on

लातूर : (Rabi Season) रब्बी हंगामातील मुख्य पीक हे ज्वारी असले तरी यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Crop Production) उत्पादनवाढीसाठी हरभऱ्याचा पर्याय निवडला होता. मराठवाड्यात सरासरीच्या दुपटीने हरभऱ्याचा पेरा झाला होता. पण क्षेत्र वाढले म्हणून उत्पादन वाढते असे नाही. सध्या हरभऱ्याची काढणी सुरु आहे. (Chickpea Crop) हरभऱ्याच्या उतारावरुन उत्पादन निदर्शानास येऊ लागले आहे. रोगराईच्या प्रादुर्भामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. शिवाय हरभऱ्याला दरही कमी आहे. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 पर्यंतचा दर मिळत आहे तर हमीभाव 5 हजार 250 रुपये ठरवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अजूनही खरेदी केंद्र ही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे घटलेले उत्पादन आणि बाजारपेठेतील दर यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार पूर्ण होणार की नाही याबाबत साशंका आहे.

यामुळे उत्पादनात झाली घट

हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरणामुळे हरभरा पीक हे बहरात होते. मात्र, खरिपाप्रमाणेच पिकांची वाढ होत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना रब्बी हंगामातील पिकांनाही करावा लागला होता. हरभऱ्याला फुल लागण्याच्या अवस्थेत आणि हे पीक चट्ट्यात असतानाच अवकाळी पाऊस झाला तर महिन्यातून 3 ते 4 वेळा दाट धुके पडले होते. त्यामुळे फुल, चट्टा गळती झाली परिणामी मररोगामुळे उत्पादनात घट होत असल्याचे आता राशीच्या दरम्यान समोर येत आहे.

हेक्टरी 5 ते 6 क्विटंलचेच उत्पादन

दरवर्षी हरभऱ्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन हे 10 ते 15 क्विटल एवढे असते. यंदा तर पोषक वातावरणामुळे यामध्ये वाढ होईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, वातावरणातील बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. खरिपात नुकसान तर रब्बीत आता उत्पादनात घट सुरु आहे. यंदा हेक्टरी केवळ 5 ते 6 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल करुन हेतू साधला जाणार का हे देखील पहावे लागणार आहे.

पीकांवर खर्च अधिक उत्पादन कमी

पेरणीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणास सुरवात झाली होती. त्यामुळे पीकांची उगवण झाली ती रोगराईला घेऊनच. मात्र, मुबलक पाणी आणि पोषक वातावरण यामुळे कीड फवारणीवर खर्च झाला तरी शेतकऱ्यांनी मागे-पुढे न पाहता खर्च केला पण आता अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे झालेला खर्च तरी पदरात पडेल का नाही हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन दराची घोडदौड सुरुच, चार महिने झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात..!

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!