Latur Market : सोयाबीन दराची घोडदौड सुरुच, चार महिने झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात..!

राजेंद्र खराडे

|

Updated on: Feb 23, 2022 | 1:54 PM

उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन काढता येत नाही. पण यंदा हे शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवला आहे त्यांनाच सध्या सुगीचे दिवस आहेत. गेल्या दहा दिवसांमध्येच सोयाबीनच्या दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली नाही. शेतकऱ्यांनीही वाढीव दराची अपेक्षा सोडून आहे त्या दरात सोयाबीन विक्री करण्याचा निर्धार केला होता. पण सध्या बाजारपेठेतले चित्र बदललेले आहे.

Latur Market : सोयाबीन दराची घोडदौड सुरुच, चार महिने झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात..!
सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असल्याने दरात सुधारणा राहणार आहे.

लातूर : उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन काढता येत नाही. पण यंदा हे शक्य झाले आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवला आहे त्यांनाच सध्या सुगीचे दिवस आहेत. गेल्या दहा दिवसांमध्येच (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली नाही. शेतकऱ्यांनीही वाढीव दराची अपेक्षा सोडून आहे त्या दरात सोयाबीन विक्री करण्याचा निर्धार केला होता. पण सध्या बाजारपेठेतले चित्र बदललेले आहे. (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ सोयाबीनचीच चर्चा आहे. मंगळवारच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. एवढ्या झपाट्याने वाढ होण्याची ही हंगामातील पहिलीच वेळ आहे. आता अपेक्षेप्रमाणे दर मिळत असल्याने सोयाबीनची आवकही वाढलेली आहे. लातूर बाजार समितीमध्ये बुधवारी 7 हजार 30 रुपये दर मिळाला तर तब्बल 24 हजार पोत्यांची आवक झाली होती. सध्या शेतीमालाची आवक जोमात असून बाजार समितीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यामुळे वाढत आहेत दर

सोयाबीन उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन हे घटलेले आहे. ब्राझिलमध्ये सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतले जाते पण यंदा घट झाली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढलेली आहे. अमेरिका आणि चीन या देशातून मागणी वाढली असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले. दुसरीकडे तेलाच्या दरवाढीचा परिणाम सोयाबीनवर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात अपेक्षेपेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

आठ दिवासांमध्ये 800 रुपयांची वाढ

15 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन हे 6 हजार 200 रुपयांवर स्थिरावले होते. शिवाय हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शेतकरीही मिळेल त्या दरात विक्री करण्याच्या तयारीत होता. त्यामुळेच दर कमी असतानाही आवक वाढली होती. साठवणूक कमी करुन शेतकरी विक्रीवर भर देत होते. पण गेल्या आठ दिवसांमध्ये चित्रच बदलले आहे. 800 रुपयांची वाढ झाली आहे. हंगामाच्या सुरवातीच्या दराची तुलना केली तर आज सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता वाढलेली आवक कायम राहते का शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावत्यात हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

नाबार्डचा पतपुरवठा : ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटींची तरतूद, काय आहेत धोरणे?

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI