Baramati : उन्हाळ्यातील चारा टंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर, शिल्लक ऊस आता जनावरांपुढे

| Updated on: Apr 21, 2022 | 12:12 PM

सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाने यंदा सर्व समस्या मिटतील असेच वाटत होते. मात्र, आता उन्हाच्या झळांबरोबर चारा टंचाईचीही समस्या वाढत आहे. रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीनंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो पण यंदा ज्वारीचे क्षेत्रच घटल्याने कडब्याचे दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चारा म्हणून शिल्लक ऊसच जनावरांच्या दावणीला टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Baramati : उन्हाळ्यातील चारा टंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर, शिल्लक ऊस आता जनावरांपुढे
भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बरोबर चारा टंचाईही निर्माण झाली आहे.
Follow us on

बारामती : सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाने यंदा सर्व समस्या मिटतील असेच वाटत होते. मात्र, आता (Summer Season) उन्हाच्या झळांबरोबर (Fodder Shortage) चारा टंचाईचीही समस्या वाढत आहे. (Rabi Season) रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीनंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो पण यंदा ज्वारीचे क्षेत्रच घटल्याने कडब्याचे दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चारा म्हणून शिल्लक ऊसच जनावरांच्या दावणीला टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उद्भवलेल्या परस्थितीमुळे दूधाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे जोड व्यवसयाचीही अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या ह्या वाढतच आहेत.

हिरवा चारा दुरापास्त, कडवळ मक्याचे दर गगणाला

पश्चिम महाराष्ट्रात हिरव्या चाऱ्यालाच अधिकचे महत्व दिले जाते. केवळ जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून कडवल आणि मक्याची लागवड केली जाते. यंदा उत्पादन क्षेत्रात घट झाल्याने कडवळ आणि मक्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पशूखाद्याच्या वाढत्या दराबरोबर आता हिरव्या चाऱ्यासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत असून दूध दरात झालेली वाढ शेतकऱ्यांच्या पचनी पडलेली नाही.

अतिरिक्त उसाचे काय ?

राज्यात गाळपाअभावी शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस गाळपाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील उसाची तोड झालेली नाही. राज्यात 80 लाख टन ऊस गाळपाविना फडातच उभा आहे. असे असतानाच आता चाराटंचाई निर्माण झाल्याने शिल्लक उसच जनावरांपुढे टाकला जात आहे. गाळप नाही किमान जनावरांना चारा म्हणून का होईना उसाचा वापर केला जात आहे. अधिकचा ऊस दुभत्या जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला नसला तरी शेतकऱ्यांकडे आता पर्यायच नसल्याने वापर वाढत आहे.

दूध उत्पादनातही घट

चाराटंचाईचा सर्वाधिक परिणाम हा दूध उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढूनही त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत नाही. हिरावा चारा तर नाहीच पण कडबाही 1 हजार रुपये शेकडा मिळत आहे. दुभत्या जनावराला अधिकच्या उसाचा धोका निर्माण होत असल्याने शेतकरी इतर मार्ग निवडतात. तर दुसरीकडे कळणा, सरकी, पेंड याचेही दर वाढलेले आहेत. एकंदरीत चारा टंचाईमुळे दूध उत्पादनावर तर परिणाम झालेला आहेच पण शेती उत्पादनातून मिळालेल्या पैशात चारा खरेदी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावत आहे.

संबंधित बातम्या :

Baramati: छत्रपती साखर कारखान्याची ऊस गाळपात सरशी, अतिरिक्त उसाचाही प्रश्न काढणार निकाली

Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस

Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!