AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati: छत्रपती साखर कारखान्याची ऊस गाळपात सरशी, अतिरिक्त उसाचाही प्रश्न काढणार निकाली

गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी ही पेटलेली आहे. साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकच्या उसाचे गाळप केले असतानाही अजूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. गाळप हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतलेली आहे. यामध्ये बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप केले आहे.

Baramati: छत्रपती साखर कारखान्याची ऊस गाळपात सरशी, अतिरिक्त उसाचाही प्रश्न काढणार निकाली
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 12:13 PM
Share

बारामती : गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील (Sugar Factory ) साखर कारखान्यांची धुराडी ही पेटलेली आहे. साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकच्या उसाचे गाळप केले असतानाही अजूनही (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. गाळप हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतलेली आहे. यामध्ये (Baramati) बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप केले आहे. यामधून तब्बल 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता अधिकची असल्याने याचा फायदा येथील ऊस उत्पादकांना देखील होत आहे. विक्रमी उसाचे गाळप करुनही जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत कारखान्याची धुराडी बंद केली जाणार नसल्याचे आश्वासन कारखाना प्रशासानाने दिले आहे.

योग्य नियोजनामुळे विक्रमी गाळप

ऑक्टोंबर 2021 मध्ये यंदाच गाळप हंगाम सुरु झाला होता. ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता प्रशासकीय स्तरावरुन योग्य ते नियोजन करण्यात आले होते. पण अपेक्षेपेक्षा यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. मात्र, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने हंगामाच्या सुरवातीपासूनच गाळपाचे योग्य नियोजन केले. शिवाय गाळपाची क्षमताही वाढवली त्यामुळेच 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर टळले आहेच पण कारखान्याची क्षमताही वाढलेली आहे.

साखरेचे उत्पादन अन् उताराही विक्रमीच

साखरेच्या उताऱ्यावरच उत्पादन अवलंबून असते. पण योग्य वेळी झालेल्या गाळपामुळे याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे. 12 लाख टन उसाचे गाळप केल्यानंतर यातून कारखान्याला 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झालेले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा समावेश आहे.छत्रपती साखर कारखान्याचा उतारा 11.07 टक्के राहिलेला आहे. अधिकच्या उताऱ्यामुळेच साखर उत्पादनात वाढ झाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.

गाळप पूर्ण झाल्यावरच धुराडी बंद

क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप होऊन देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे. शिवाय शिल्लक उसाची तोड होईपर्यंत कारखाना प्रशासनाने कारखाने बंद करु नयेत अशा सूचनाही दिल्या आहेत. एवढेच नाही तर मराठवाड्यातील शिल्लक उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सरसावले आहेत. असे असतानाच कार्यक्षेत्रातील उसाचे टिपरुही शिल्लक ठेवणार नसल्याचा निर्धार छत्रपतू सहकारी साखर कारखान्याने केला आहे.

संबंधित बातम्या :

Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस

Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!

Unseasonable Rain: द्राक्षानंतर कांदा नुकसानीने डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला! देवळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.