Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान

| Updated on: Jan 14, 2022 | 2:07 PM

खरिपापाठोपाठ यंदा रब्बी हंगामातही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. महिन्याकाठी अवकाळी पाऊस हा ठरलेलाच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते पण आता गारपिटमुळे भाजीपालाही पाण्यात अशीच अवस्था झाली आहे. आतापर्यंत अवकाळी आणि गारपिट ही विदर्भात अधिक प्रमाणात झाली होती.

Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर तालुक्यात गारपिटीने हजेरी लावली होती. यामध्ये भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Follow us on

नांदेड : खरिपापाठोपाठ यंदा रब्बी हंगामातही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. महिन्याकाठी अवकाळी पाऊस हा ठरलेलाच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते पण आता गारपिटमुळे भाजीपालाही पाण्यात अशीच अवस्था झाली आहे. आतापर्यंत अवकाळी आणि गारपिट ही विदर्भात अधिक प्रमाणात झाली होती. पण आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्याती देगलूर आणि मुखेड तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण भाजीपाल्याचीही सुटका झालेली नाही. लागवड केल्यानंतर भाजीपाला जोमात होता त्यामुळे मध्यंतरीच्या अवकाळीचा परिणाम झाला नव्हता पण गारपिटच्या तडाख्यात न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

नुकसान अन् आर्थिक झळही

सध्या होत असलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण हे कोणत्याच पिकासाठी फायद्याचे नाही. आतापर्यंत भाजीपाल्यापर्यंत नुकसानीची झळ ही पोहचलेली नव्हती पण बुधवारी मुखेड, देगलूर तालुक्यात झालेल्या गारपिटमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटो पीक तर उध्वस्त झालेच आहे पण टोमॅटो रोपाच्या सुरक्षतेसाठी जे प्लॅस्टिक अच्छादन केलेले असते त्याचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गव्हावर मावा तर हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पिकांचे संरक्षण करीत असताना आता गारपिटीवने नवेच संकट उभे केले आहे.

यामुळे वाढतेय भाजीपाल्याचे क्षेत्र

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे तर रब्बी हंगामावर अवकाळी पावसाची अवकृपा ही पेरणीपासून कायम आहे. हे कमी म्हणून की काय सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटातून दूर राहण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड केली होती. किमान या अनोख्या उपक्रमातून का होईना उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा निर्धार होता पण निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने असल्याने शेतकऱ्यांचा आशा मावळत आहेत. आता हातातोंडाशी आलेले पीक गारपिटीने हिरावलेले आहे.

संबंधित बातम्या :

Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय

farmer loan : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर, नाबार्डचा मोठा निर्णय

Untimely Rain: खरीप-रब्बीमध्ये मुख्य पिकांचेच नुकसान, शेतकऱ्यांनी निवडला वेगळाच मार्ग