Untimely Rain: खरीप-रब्बीमध्ये मुख्य पिकांचेच नुकसान, शेतकऱ्यांनी निवडला वेगळाच मार्ग

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांचेच नुकसान झाले होते तर आता रब्बी हंगामावर अवकाळीचे सावट कायम आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुण काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे अगोदरच पेरण्या लांबणीवर पडल्या त्यात पुन्हा पेरणी होऊन देखील निसर्गाचा लहरीपणा हा कायम आहे. सध्याच्या अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात थेट भाजीपाल्यावरच भर दिला आहे.

Untimely Rain: खरीप-रब्बीमध्ये मुख्य पिकांचेच नुकसान, शेतकऱ्यांनी निवडला वेगळाच मार्ग
संग्रहीत छायाचित्र

लातूर : खरीप हंगामात (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांचेच नुकसान झाले होते तर आता रब्बी हंगामावर अवकाळीचे सावट कायम आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे खरिपात झालेले नुकसान (Rabi Season) रब्बी हंगामात भरुण काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे अगोदरच पेरण्या लांबणीवर पडल्या त्यात पुन्हा पेरणी होऊन देखील निसर्गाचा लहरीपणा हा कायम आहे. सध्याच्या (Untimely Rain) अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात थेट भाजीपाल्यावरच भर दिला आहे. लातूरसह, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामात ज्वारी, गहू पीकाचे उत्पन्न घेतले जाते पण बदललेली परस्थिती पाहता आता उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा लावडीवर भर दिला आहे. किमान पाण्याचा योग्य वापर होईल या आशेने शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहेत. त्यामुळे हा प्रयोग तरी यशस्वी होणार का हा प्रश्न कायम आहे.

कांदा हाच पर्याय

खरिपासह आता रब्बी हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम झालेला आहे. कांदा हे कमी कालावधीत येणारे पिक आहे. यंदा कृषी विभागाच्या आव्हानानंतर शेतकऱ्यांनी ज्वारीला बाजूला सारत हरभऱ्याचा पेरा केला होता. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे पण पेरणीपासून अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ तर खुंटलेली आहे शिवाय घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अधिकचा खर्च होत आहे. परिश्रम आणि उत्पादनावर खर्च करुनही पदरी काही पडत नसल्याने आता कांद्याचाच पर्याय निवडला जात असल्याचे शेतकरी अमोल तांदळे यांनी सांगतिले आहे. यामध्येही धोका असला तरी दराचे गणित जुळले तर चार पैसे पदरी पडतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मुबलक पाण्याचा योग्य वापर

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने यंदा मुबलकप्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पाण्याचा योग्य वापर होत नाही. रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पाणी देण्यापूर्वीच पिकांचे नुकसान झाले आहे. याकरिता शेतकरी आता उन्हाळी हंगामातील पिकांवर भर देत आहेत. यामध्ये सरी पध्दतीने कांद्याची लागवड करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असतानाही दर हे टिकून आहेत. भविष्यातही असेच दर राहतील ही अपेक्षा शेतकरी बाळगत आहेत.

रब्बीतून नाही आता उन्हाळी हंगामातून भरपाई

खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीतून भरुन निघेल असा विश्वास होता. पण जे खरीप हंगामातील पिकांचे झाले आता तेच अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांची अवस्था झाली आहे. सध्या खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्याचे क्षेत्र रिकामे झाले आहे. या क्षेत्रावर आता उन्हाळी हंगामातील कांदा लागवड केली जात आहे. कांद्याचे पीकही धोक्याचेच मानले जाते मात्र, कमी कालावधीचे असल्याने अधिकचा खर्च नाही त्यामुळे कांदा लागवडच केली जात असल्याचे उस्मानाबादचे शेतकरी गणेश भुसारे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

बदलती शेतीपध्दती : आता ‘विकेल तेच पिकेल’, पुसनदच्या तरुण शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग, वाचा सविस्तर

Mango fruit: फळांचा राजा पुन्हा अडचणीत, आता थेट उत्पादनावर परिणाम

Natural Farming : केंद्र सरकारचा नैसर्गिक शेतीवर भर मात्र, कृषी संशोधन परिषदेचा अहवाल काय सांगतो, वाचा सविस्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI