AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलती शेतीपध्दती : आता ‘विकेल तेच पिकेल’, पुसनदच्या तरुण शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग, वाचा सविस्तर

पारंपारिक पिकांमधून अपेक्षित उत्पादन पदरी पडत नाही यातच निसर्गाच्या लहरीपणावरच शेती अवलंबून आहे. या वास्तवाचे भान ठेऊन एकनाथ चौधरी यांनी अशक्य असे काहीच नाही म्हणत थेट औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवण्यासाठी अथक परीश्रम आणि त्यामध्ये सातत्य ठेवल्यानेच 10 एकरातून शतावरी, अश्वगंधाचे उत्पादन घेतले आहे.

बदलती शेतीपध्दती : आता 'विकेल तेच पिकेल', पुसनदच्या तरुण शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 11:24 AM
Share

नंदुरबार : ‘विकेल तेच पिकेल’ या पध्दतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करण्याचे अवाहन केवळ (Agricultural Department) कृषी विभागाकडून केले जाते. पण अथक परिश्रम आणि वेगळा प्रयोग करुन हे सत्यामध्ये उतरावयाचे कसे याचे दर्शन घडवून आणले आहे ते शहादा तालुक्यातील पुसनदच्या एका तरुण शेतकऱ्यांनी. पारंपारिक पिकांमधून अपेक्षित उत्पादन पदरी पडत नाही यातच निसर्गाच्या लहरीपणावरच शेती अवलंबून आहे. या वास्तवाचे भान ठेऊन एकनाथ चौधरी यांनी अशक्य असे काहीच नाही म्हणत थेट (medicinal plant) औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवण्यासाठी अथक परीश्रम आणि त्यामध्ये सातत्य ठेवल्यानेच 10 एकरातून शतावरी, अश्वगंधाचे उत्पादन घेतले आहे. मागणी अधिक अन् उत्पादन कमी यामुळे दरही चांगला मिळत असून त्यांनी ह्या अनोख्या प्रयोगातून लाखो रुपये कमावले आहेत.

म्हणून निवडली वेगळी वाट..

पारंपारिक शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही तर अधिकचे परिश्रम हे ठरलेलेच. शिवाय काळाच्या ओघात वातावरणात मोठा बदल झाला असून एका हंगामातील पिकांवर तीन ते चार वेळा नैसर्गिक संकट हे बेतत आहे. त्यामुळे वर्षभराचे परीश्रम आणि खर्च दोन्हीही वायाच.  बाजारपेठेतली मागणी आणि दराचा अभ्यास करुन त्यांनी हा निर्णय घेतला. मुख्य पिकातून तर उत्पन्न मिळतेच शिवाय पाने मुळे कंद बिया यांची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. त्यामुळेच त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत औषधी वनस्पतीला पसंती दिली होती.

औषधी वनस्पतीचे मार्केट

शतावरीचे आणि अश्वगंधा यांचे पाने मुळे कंद बिया यांची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असतो. मुळाची वर्गवारी करून विक्री करता येते. त्याला 10 हजार क्विंटल पासून ते 40 हजार पर्यंत त्याचा गुणवत्ता वर दर मिळतो त्याचा पाला आणि बीजला मोठी मागणी असते बाजारपेठ उपलब्ध असून मागणी पेक्षा उपलब्धता कमी आसल्याने दर पडण्याची भीती नसते त्याच सोबत या औषधी वनस्पती वर कीड पडण्याची शक्यता खूप कमी असल्याने फवारणी वैगरे ची गरज नसते.

तरुण शेतकऱ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रथमच अशाप्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. औषधी वनस्पतीचे उत्पादन ही वेगळीच संकल्पना असली तरी तरुण शेतकऱ्याने यशस्वी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे आता परिसरातील शेतकरीही त्याने अनुकरण करीत असून उत्पदनात वाढ होत आहे. पारंपारिक शेतीमध्ये अनेक प्रकारचे धोके वाढले आहेत. शिवाय परिश्रम करुनही सर्वकाही निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे असेच प्रयोग आता उत्पादनवाढीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

Mango fruit: फळांचा राजा पुन्हा अडचणीत, आता थेट उत्पादनावर परिणाम

Natural Farming : केंद्र सरकारचा नैसर्गिक शेतीवर भर मात्र, कृषी संशोधन परिषदेचा अहवाल काय सांगतो, वाचा सविस्तर

Milk Business: आता विद्यापीठातूनच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे धडे, कृषी विद्यापीठाचा पुढाकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.