Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय

यंदा उत्पादनापेक्षा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागल्याने यंदा प्रथम द्राक्षांचे दर ठरवण्याचा निर्णय द्राक्ष उत्पादक संघाने घेतला होता. मात्र, ज्या नाशिक जिल्ह्यातून या अनोख्या उपक्रमाला सुरवात झाली होती त्याच जिल्ह्यात संघाच्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे.

Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय
नाशिक जिल्ह्यातील काही भागात द्राक्ष काढणीला सुरवात झाली आहे पण दर ठरवण्यावरुन मतभेद सुरु आहेत.

नाशिक : निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान, उत्पादनात घट आणि बाजारपेठेत मिळत असलेले दर यामुळे द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. यंदा उत्पादनापेक्षा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागल्याने यंदा प्रथम (Grape Rate) द्राक्षांचे दर ठरवण्याचा निर्णय (Grape Growers Association) द्राक्ष उत्पादक संघाने घेतला होता. मात्र, ज्या (Nashik) नाशिक जिल्ह्यातून या अनोख्या उपक्रमाला सुरवात झाली होती त्याच जिल्ह्यात संघाच्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे. ठरलेल्या दरानेच शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री करण्याचा निर्णय एकमुखाने झाला होता. पण आता ठरल्यानुसार जानेवारीचा दर हा 82 रुपये प्रति किलो आहे. पण व्यापाऱ्यांनी नियम डावलून शेत शिवारामध्ये 55 रुपयांपर्यंत द्राक्ष खरेदी केली आहे. अशा तक्रारी आता दाखल होत असून संघाने घेतलेल्या निर्णयाचे काय होणार हे पहावे लागणार आहे.

काय ठरले होते बैठकीत?

उत्पादन खर्चावर आधारित किमान 10 टक्के नफा पकडून हे दर ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी महिन्यात प्रतिकिलो 82 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 71 तर मार्चमध्ये 62 रुपये हा कमीत कमी दर करण्यात आला होता. विविध वाण, रंग, आकार, गुणवत्ता हे निकष गृहीत धरून या निश्‍चित दरापेक्षा अधिक दरानेच विक्री करण्यात यावी, असा सर्वानुमते निर्णय झाला. द्राक्षांच्या दराबाबत हा ऐतिहासिक निर्णय असून शेतकऱ्यांनीही हे दर एकमताने मान्य केले होते. या निर्णयामुळे एक नवा पायंडा आता पडणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण आता कमी दराने विक्री केली असल्याने शेतकऱ्यांची एकजूट कायम राहणार का हे पहावे लागणार आहे.

व्यापाऱ्यांकडून होतेय शेतकऱ्यांची कोंडी

द्राक्ष काढणीच्या दरम्यान, व्यापाऱ्यांकडून संघाने ठरवलेल्या दराप्रमाणे खरेदी करण्याचे मान्य केले जात आहे. पण प्रत्यक्ष तोडणी आणि सर्व प्रक्रिया झाली की, बाजारपेठेत मागणी घटली आहे असे कारण सांगून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. माल पॅक हाउसला गेल्यानंतर माल नाकारण्याचे प्रकार काही ठरावीक निर्यातदार करत असल्याच्या तक्रारी आहेत. काढणी सुरू झाल्यानंतर एकाच दिवसात बाजार कसे पडतात, मग वाढल्याचे का दाखवीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

निर्णयाची अंमलबजावणी होणारच

निर्यातदारांकडून कमी दराने द्राक्षाची खरेदी झाली होती. मात्र, संघाने घेतलेला निर्णय आता निर्यातदारांनाही सांगितला जाणार आहे. यापूर्वी एक बैठक झाली होती. आता झालेल्या प्रकारामुळे पुन्हा बैठक घेऊन संघाचा निर्णयच अंतिम ठेवला जाणार आहे. यासंबंधी रविवारी बैठक पार पाडणार आहे. हा एक प्रकार समोर आला असला तरी भविष्यात असे होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी tv9 मराठी डिजीटलशी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

farmer loan : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर, नाबार्डचा मोठा निर्णय

Untimely Rain: खरीप-रब्बीमध्ये मुख्य पिकांचेच नुकसान, शेतकऱ्यांनी निवडला वेगळाच मार्ग

बदलती शेतीपध्दती : आता ‘विकेल तेच पिकेल’, पुसनदच्या तरुण शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग, वाचा सविस्तर

Published On - 1:19 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI