AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni-Gautam Gambhir : कोच साहब हास्य तुमच्या चेहऱ्यावर..या धोनीच्या पोस्टला गौतम गंभीरने दिलं असं उत्तर

MS Dhoni-Gautam Gambhir : टीम इंडिया काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना खेळली. यावेळी दोन वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन एम एस धोनी तिथे हजर होता. गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांचं नातं सर्वश्रुत आहेच. एकत्र क्रिकेट खेळताना दोघांच्या नात्याची नेहमीच चर्चा व्हायची.

MS Dhoni-Gautam Gambhir : कोच साहब हास्य तुमच्या चेहऱ्यावर..या धोनीच्या पोस्टला गौतम गंभीरने दिलं असं उत्तर
Dhoni-Gambhir
| Updated on: Mar 09, 2026 | 1:55 PM
Share

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एमएस धोनीला पाहून खूप मस्त वाटलं, असं टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. भारताने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील पहिली टीम आहे. त्याशिवाय तिसऱ्यांदा हा सन्मान मिळवलाय. कालच्या फायनल मॅचच्यावेळी स्टेडियममध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंतच्या भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव, एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे तिथे हजर होते.

वर्ल्ड कप विजयानंतर विकेटकीपर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने इन्स्टाग्रामवर टीमच्या अभिनंदनाची एक पोस्ट केली. यात त्याने हेड कोच गौतम गंभीरला जास्त हसण्याचा सल्ला दिला. हास्य तुझ्या चेहऱ्यावर चांगलं दिसतं असं तो गंभीरला म्हणाला. कोच साहब हास्य तुमच्या चेहऱ्यावर सुंदर दिसतं असं धोनीने त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. आज दुपारी गौतम गंभीरने कमेंट सेक्शनमध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वर्ल्ड कप विजय हे हास्याचं एक मोठ कारण आहे. त्यात गंभीर यांनी धोनीला पाहून छान वाटलं असही लिहिलय. हसण्यासाठी सुद्धा काय कारण आहे, तुला पाहून छान वाटलं असं गंभीरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलय.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

काही जणांची पूजा करणं पटत नाही

टीम इंडियातून एकत्र खेळताना भारताच्या विजयासाठी गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांनी आतापर्यंत अनेक भागीदाऱ्या केल्या आहेत. खासकरुन लक्षात राहण्यासारखी पार्टनरशिप म्हणजे श्रीलंकेविरुद्ध 2011 वर्ल्ड कप फायनलमधील. दोघांमधलं जे नातं आहे, त्याची नेहमीच चर्चा होते. टीममधील काही जणांची पूजा करणं पटत नाही हे गंभीर जाहीरपणे बोलला होता. हे दोघे जेव्हा सार्वजनिक ठिकाणी दिसतात, तेव्हा एकमेकांशी हास्यविनोदातून हसून खेळून बोलताना दिसतात.

Gauti

फायनलमध्ये न्यूझीलंडची लास्ट विकेट गेल्यानंतर रोहित आणि धोनीला झालेला आनंद सर्व काही सांगून गेला. त्यांनी सुद्धा टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय सेलिब्रेट केला.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप