4.77 लाख रुपयांमध्ये दिवाळीत घरी आणा ही नवीन कार, 26 किमी मायलेज अन् गर्दीत चालवण्यासाठी देखील सोपी

26 किमी मायलेज अन् किंमत फक्त 4.77 लाख रुपये. दिवाळीमध्ये घरी आणा सर्वात स्वस्त आणि ऑटोमॅटिक कार. घेण्यासाठी शोरुममध्ये होतेय प्रचंड गर्दी.

4.77 लाख रुपयांमध्ये दिवाळीत घरी आणा ही नवीन कार, 26 किमी मायलेज अन् गर्दीत चालवण्यासाठी देखील सोपी
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 23, 2026 | 8:04 PM

दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट मर्यादित असेल तर बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच कार चालवणाऱ्यांसाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कार फायदेशीर ठरू शकतात. गर्दीच्या रस्त्यांवर वारंवार गिअर बदलण्याची गरज कमी होत असल्याने ड्रायव्हिंग करणे तुलनेने सोपे होते. मारुती सुझुकीपासून टाटापर्यंत अनेक कंपन्यांच्या कार 5 ते 6 लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध आहेत

मारुती सुझुकी एस-प्रेसो (S-Presso)

Loading...

या यादीतील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक पर्याय. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन, 5-स्पीड AGS गिअरबॉक्स आणि कंपनीच्या दाव्यानुसार 25.30 किमी मायलेज मिळते. छोट्या आकारामुळे शहरातील वाहतुकीत चालवणे सोपे जाते. या कारची किंमत 4.77 लाख रुपये आहे.

रेनॉ क्विड (Renault Kwid)

आकर्षक डिझाइन आणि SUVसारखा लूक ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि AMT गिअरबॉक्स मिळतो. काही व्हेरिएंटमध्ये टचस्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या कारची किंमत 4.90 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी ऑल्टो K10

कमी आकारामुळे अरुंद रस्ते आणि शहरातील गर्दीत चालवण्यासाठी ही कार फायदेशीर ठरू शकते. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि कंपनीच्या दाव्यानुसार 24.90 किमी मायलेज मिळते. 4.97 लाख रुपये या कारची किंमत आहे.

मारुती सुझुकी सेलेरिओ (Celerio)

चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाणारी ही कार 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि AMT गिअरबॉक्ससह मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार मायलेज 26 किमी आहे. पेट्रोलसोबत CNG पर्यायही उपलब्ध आहे; मात्र CNG व्हेरिएंटमध्ये गिअरबॉक्सचा पर्याय तपासावा. या कारची किंमत 5.63 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (WagonR)

उंच छतामुळे केबिनमध्ये डोक्याजवळ चांगली जागा मिळते. कुटुंबासाठी उपयुक्त असलेल्या या कारमध्ये व्हेरिएंटनुसार 1.0 किंवा 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. 5.99 लाख रुपये या कारची किंमत आहे.

टाटा टियागो (Tata Tiago)

टाटाची ही हॅचबॅक पेट्रोल आणि निवडक CNG व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. व्हेरिएंटनुसार टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि पार्किंगसाठी उपयुक्त सुविधा मिळतात. या कारची किंमत 6 लाख रुपये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us